जत,(प्रतिनिधी)-
कुंभारी ता.जत येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे. तर गुळवंची येथे आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम सुरु आहे. या कामाकरिता तत्कालीन सरपंच ताई पाटील व कमळाबाई पाटील यांचे योगदान आहे. या मंजूर कामाचे प्रभाकर जाधव यांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये. जनतेची दिशाभूल करु नये,अशी टीका जत पंचायत समितीच्या सदस्या अर्चना पाटील व युवक नेते नाथा पाटीलसह पाच गावच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेस कोसारीचे सरपंच तानाजी बिसले, उपसरपंच बाळासाहेब पवार,बागेवाडीचे उपसरपंच लक्ष्मण चौगुले, प्रतापूरचे सरपंच सौ.संगीता हेगडे ,उपसरपंच आप्पासाहेब खांडेकर ,सोसायटीचे अध्यक्ष बापू शेंडगे, माजी सरपंच कमळाबाई पाटील , उपसरपंच कृष्णा जाधव, गुळवंचीचे माजी सरपंच गणपती कोळेकर आदी उपस्थित होते.
गुळवंची उपकेंद्र ,कुंभारी आरोग्य केंद्र व प्रस्तावित बिरनाळ उपकेंद्र या कामाशी प्रभाकर जाधव यांचा कसलाही संबंध नाही. तरीदेखील फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत .गुळवंची आरोग्य उपकेंद्राकरिता तत्कालीन सरपंच गणपती कोळेकर व इंदूबाई खटके यांनी प्रयत्न केले आहेत. सदरची कामे सन २०१२ ते२०१७ या कालावधीतील आहेत. असे अर्चना पाटील यांनी सांगितले.
सध्या पाणीटंचाईची समस्या मोठी आहे. बागलवाडी ,काशीलिंगवाडी, सिंगनहळ्ळी या गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पैसे भरूनही लोकांना पाणी मिळत नाही .जनावरांना चारा नाही.विकतचा चारा शेतकरी घेत आहेत. पाण्यासारख्या ज्या कामासाठी मतदारांनी जाधव यांना निवडून दिले. ते काम जाधव करूच शकले नाही. हे या भागातील मतदारांचे दुर्देव म्हणावे लागेल. अशी टीका काँग्रेस युवा नेते नाथा पाटील यांनी केली. तर पूर्वीच्याच रोजगार हमीतून झालेल्या मुरमीकरण्याच्या कामावर मलमपट्टी करुन पैसे काढण्याचा उद्योग सुरु केला असल्याचा आरोप केला.
म्हैसाळचे कॅनॉल फोडण्यास शेतकऱ्यांना जाधव चिथावणी देत होते. परिणामी शेतकऱ्यांना तुरुगांची हवा खावी लागली आहे. आतापर्यंत काशलिंगवाडी व गुळवंची येथील कॅनाल फोडले आहेत .त्यास जाधव यांनी चिथावणी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.तरी या भागातील शेतकऱ्यांनी रितसर पाणी घ्यावे. कॅनॉल फोडू नयेत असेही आवाहन पाटील यांनी केले.
म्हैसाळच्या कॅनॉलवर जाऊन सेल्फी काढून जणू काही आमदार झाल्याचा त्यांना भास होत आहे. जाधव यांना गावातील स्थानिक सर्व सेवा संस्थेत निवडून येता आले नाही .त्यांनी आमदारकीचे दिवास्वप्न पहावे का ? असाही टोला नाथा पाटील यांनी लागवला.
No comments:
Post a Comment