Sunday, February 3, 2019

जतमधील अंजुमन उर्दू हायस्कूलचा कायापालट

'युथ फॉर जत'ने केले सहकार्य
जत,(प्रतिनिधी)-
जत येथील अंजुमन उर्दू हायस्कूल ही एकमेव उर्दू माध्यमिक शाळा आहे. या शाळेला स्वतः ची इमारत नाही. ही शाळा जिल्हा परिषद शाळा नंबर २ च्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या छोट्याश्या इमारती मध्ये भरते.

गेल्या महिन्यात 'युथ फॉर जत'चे इंग्लंड स्थायिक सह-संस्थापक अजय पवार व जतचे व्यापारी फारूक मणियार यांच्यासह अन्य संचालकांनी  शाळेला भेट दिली.  शाळेचे मुख्याध्यापक रईस खान यांच्याशी शाळेच्या सदय स्थितीवर चर्चा केली. निरीक्षणाअंती शाळेला नवीन पद्धतीच्या हिरव्या पृष्ठभागाच्या फळ्यांची निकड गरज लक्षात आली. एवढेच नव्हे तर शाळांच्या भिंतींचे रंग उडाले होते. या गोष्टी देण्याचा निर्णय 'युथ फॉर जत' ने घेतला.या गोष्टीमुळे अल्पावधीतच शाळेचे रंगरूप बदलले. यामुळे शाळेचे रंगरूपच पालटूल गेले आहे. शाळा एकदम सुंदर दिसू लागली आहे आणि विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटू लागले आहे.
यानिमित्ताने एक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जत शहरातील सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ हरीश माने हे लाभले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये 'युथ फॉर जत'च्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. तसेच उर्दू शाळेच्या व्यथा मांडल्या. युथ फॉर जत चे सचिव अमित बामणे यांनी संस्थेच्या डिजिटल शाळा, फिरते ग्रंथालय या महत्वाच्या उपक्रमा बरोबरच इतर उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमा दरम्यान एका विद्यार्थीने इंग्रजी मध्ये भाषण केले तसेच एका विद्यार्थिनीने गिटार वर भारतीय राष्ट्रगीत वाजवून सर्वांची मने जिंकली. दिनेश शिंदे, सचिव श्री अमोल बामणे तसेच या या शाळेच्या कायापालटसाठी अहोरात्र झटलेले संस्थेचे पदाधिकारी,सचिन जाधव, प्रमोद साळुंखे,प्रशांत अर्गोद्दी,गुरु कुलकर्णी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment