जत,(प्रतिनिधी)-
माडग्याळ (ता.जत) जवळील जत्तीवस्तीवरील श्रीशैल सत्यपा माळी (वय 65 वर्षे) यांच्या लसणाच्या पिकाच्या शेतात बेकायदा बिगरपरवाना गांजाची झाडाची बेकायदा लागवड केल्याचे आढळून आले. याची माहिती उमदी पोलिसांना मिळताच त्यांनी छापा टाकून सुमारे साडेसतरा हजार रुपयांचा गांजा जप्त केला.
या प्रकरणी उमदी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. या गांजा लागवडीची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्री. दांडगे,पो. हे. का. शिवाजी दिघे ,पो.हे. का. बसवराज कोष्टी, पोलिस नाईक श्रीशैल वळसंग, सचिन आटपाडकर, वाहन चालक सुधाकर पाटील, कर्मचारी इंद्रजीत घोदे,अर्जुन सगर यांनी मिळून पंचांसमक्ष आरोपीच्या लसणाच्या शेतात 4 फूट उंचीचे झाड तसेच 3 हजार 500 ग्राम किलो वजनाची ओलसर झाडे असा बेकायदा बिगर परवान्याचा सुमारे 17 हजार 500 रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. या गुन्ह्यातील आरोपी ताब्यात असून त्यांना अटक करण्याची तजवीज ठेवली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे करीत आहे
No comments:
Post a Comment