बचत प्रत्येकासाठी महत्त्वाची मानली जाते. कमी वयात बचत सुरू करण्याचे अनेक लाभ असतात पण उशीरा म्हणजे वयाच्या तिशीनंतर बचतीला सुरुवात केली तरी काळजी करण्याचं काहीच कारण नाही. पुढच्या वीस वर्षांमध्ये म्हणजे वयाच्या पन्नाशीपर्यंत तुम्ही महिन्याला तीन लाख रुपये उत्पन्न मिळवू शकता. यासाठी तुम्हाला आत्तापासूनच दरमहा २0 हजार रुपये बचत करायला हवी. या बचतीचा फॉर्म्युला जाणून घेऊ ..
समजा, सध्या तुमचा मासिक खर्च ५0 हजार रुपये आहे. सध्याच्या महागाईचा दर सात टक्के आहे. महागाईच्या दराचा विचार केला तर वीस वर्षांनंतर तुम्हाला महिन्याला दोन लाख रुपये लागतील. दरमहा दोन लाख रुपये खर्च करायचे असतील तर तुमच्याकडे चार कोटी रुपयांचा निधी असणं गरजेचं आहे. चार कोटी रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही वर्षाला नऊ टक्के दराने व्याज मिळवू शकता. चार कोटी रुपयांवर नऊ टक्के दराने व्याज म्हणजे वर्षाला ३६ लाख रुपये मिळतील. म्हणजे दर महिन्याला तुमच्याकडे तीन लाख रुपये असतील.
२0 वर्षांनी तुम्हाला चार कोटी रुपयांचा निधी हवा असेल तर वीस वर्षं दरमहा वीस हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तुमचं उत्पन्न वर्षाला दहा टक्क्यांनी वाढत असेल तर गुंतवणूकही दहा टक्क्यांनी वाढवायला हवी. म्हणजे पुढच्या २0 वर्षांमध्ये चार कोटी रुपयांचा निधी जमा होईल. चार कोटी रुपयांचा निधी हवा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. फार धोका पत्करायचा नसेल तर इक्विटी फंडाचा विचार करू नका. इक्विटी आणि डेट फंड यांचा समतोल साधा. यामुळे तुम्हाला वर्षाला १२ टक्क्यांनी परतावा मिळू शकेल. धोका पत्करायचा असेल तर तुम्ही इक्विटी फंडात गुंतवणूक करू शकता. त्यात तुम्हाला वार्षिक सुमारे १५ टक्के दराने परतावा मिळू शकतो.
No comments:
Post a Comment