Wednesday, February 27, 2019

संत रविदासांनी समानतेची शिकवण दिली: अगावणे


 मुचंडी येथे संत रविदास यांची जयंती उत्साहात
जत,(प्रतिनिधी)-
आपण सारेच चामड्यापासून बनलेलो आहोत म्हणूनच प्रत्येकजण समान आहोत, असा संदेश संत रविदास महाराजांनी समाजाला दिला, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा राष्ट्रीय रविदास परिषदेचे महासचिव अशोक अगावणे यांनी जत तालुक्यातील मुचंडी येथे बोलताना केले.

जत तालुक्यातील मुचंडी येथे श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची 621 वी जयंती उत्सव सोहळा आणि समाज प्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संत गुरू रविदास समाज बहु उद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना श्री. अगावणे म्हणाले, संत रविदासांनी आपल्या दोह्यांतून प्रत्येकाने सत्याचा स्वीकार करावा, प्रत्येक बाब सत्याच्या कसोटीवरच तपासून पाहावी, असा उपदेश करायचे. यावेळी कु.प्रज्ञा काटे, कु. साक्षी व्हनखंडे, कु. सृष्टी सूर्यवंशी, आर्यन कणसे या बाल वक्त्यांनी संत रविदास यांच्याविषयी माहिती सांगितली.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय रविदास परिषदेचे सचिव तसेच संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी मुचंडी येथे नियोजित रविदास सभा मंडपाचे काम लवकर पूर्ण करण्याचा इरादा बोलून दाखवला. सरपंच श्री.पाटील यांनी याबाबत सहकार्य केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
या कार्यक्रमावेळी राष्ट्रीय रविदास परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोहर शिंदे, सरपंच अशोक पाटील, सुशीला होनमोरे, हणमंत दुधगी,, प्रभाकर सनामडीकर, तुकाराम माळी, इब्राहिम नदाफ,सुनील सूर्यवंशी,बाबासाहेब काटे,किरण शिंदे,तानाजी व्हनखंडे,मच्छिंद्र ऐनापुरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.  हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शंकर शिंदे,संतोष महाजन, हणमंत संकपाळ, बाळासाहेब वाघमारे,रमेश शिंदे, पिंटू शिंदे, वसंत महाजन,हणमंत शिंदे,चंद्रकांत शिंदे,वर्षा वाघमारे,वंदना संकपाळ आदींनी परिश्रम घेतले.





No comments:

Post a Comment