Friday, February 15, 2019

जतमध्ये एकावर पोक्सोअंतर्गत कारवाई

जत,(प्रतिनिधी)-
घोलेश्वर (ता.जत)येथील एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी  कोंडीबा मल्हारी तांबे (रा.घोलेश्वर) याच्यावर जत पोलीसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.या इसमास अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी तिच्या  बहिणीसमवेत येळवी येथे शिक्षणासाठी ये जा करत असते. पिडीत अल्पवयीन मुलगी तारीख 12 फेबूवारी रोजी सायकांळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना पीडित मुलीला अडवत कोंडीबा याने 'तू मला आवडतेस, माझ्या गाडीवर बस' म्हणून तिचा हात ओढण्याचा प्रयत्न केला, तरीही मुलगी गाडीवर न बसल्याने त्याने तिची ओढणी धरून ओढू लागला. मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.असाच प्रकार तारीख 13 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता येळवी ते तांबेवाडी रोडवर घडला. याबाबत पीडित मुलीने घरी याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली पोलिसांनी मुलगी अल्पवयीन असल्याने महिला लैंगिक अत्याचार (पोस्को) अंतर्गत कारवाई केली आहे.अधिक तपास उपनिरिक्षक सचिन गढवे करत आहेत.

No comments:

Post a Comment