Friday, February 1, 2019

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट

सांगली,(प्रतिनिधी)-
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर करणार्‍या नागरिकांसाठी खुशखबर आहे. घरगुती वापराचा एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला असून आजपासूनच नवे दर लागू झाले आहेत. विनाअनुदानित गॅस सिलेंडर ३0 रुपयांनी तर अनुदानित गॅस सिलेंडरची किंमतीत एक रुपया ४६ पैशांनी कपात करण्यात आली आहे.

राज्यभरात मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. गेल्या महिन्याभरात तिसर्‍यांदा घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने विनाअनुदानित गॅस सिलिंडर १२0.५0 रुपयांनी स्वस्त केले होते. तसेच अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५.९१ रुपयांनी कमी केली होती. सध्या १४.२ किलोचा अनुदानित सिलिंडरला ग्राहकांना ४९४ मोजावे लागतील. तर विनाअनुदानित सिलिंडरसाठी ६८९ रुपये मोजावे लागणार आहेत. याबाबत भारतातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून ही माहिती देण्यात आली आहे.

   

No comments:

Post a Comment