जत,(प्रतिनिधी)-
आपण शिक्षक समितीचा सच्चा कार्यकर्ता
असून कुठल्याही अन्य शिक्षक संघटनेत प्रवेश केलेला नाही. आपण पेन्शन आंदोलनासाठी सांगलीत उपस्थित होतो.
याचा विपर्यास करून हेतुपुरस्सर आपण शिक्षक भारती संघटनेत प्रवेश केल्याचे
प्रसिद्ध केले आहे. ही बातमी खोडसाळपणे देण्यात आली आहे,
अशी माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा संघटक गुणवंत विधाते
यांनी एका निवेदनाद्वारे दिली.
सांगली एथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
डीसीपीएसधारकांचे 28 जानेवारीला आंदोलन
होते. त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो. नंतर
आम्ही त्रिकोणी बागेत गेलो. तिथे शिक्षक भारतीची बैठक चालली होती.
तिथल्या पदाधिकारी यांनी आमचे स्वागत केले. मात्र
याचा विपर्यास करून शिक्षक भारतीत प्रवेश केल्याचे प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
फेसबूक वरील फोटोचा वापर करण्यात आला आहे. मी पूर्वीपासून
शिक्षक नेते दयानंद मोरे, दीपक कोळी यांच्या नेतृत्वाखाली काम
करत आहे. 2005 नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाली
पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. त्यासाठी आमचा प्रयत्न राहणार
आहे. बाकी कसलाच संबंध अन्य संघटनेशी नाही.
माडग्याळ येथे झालेल्या शिक्षक पदाधिकार्यांच्या बैठकीला राजकुमार करडी, परमेश्वर मुंडे, भिवाजी देशमुख,
सुरेश राख, आनंद पाटील, आर.
आर. सावंत, तालुकाध्यक्ष
रामराव मोहिते,सुभाष हुवाळे, चनबसू चौगुले,
सौदागर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment