Monday, February 4, 2019

राष्ट्रीय सेवा योजना प्रगल्भ बनविण्याचे माध्यम-प्राचार्य डॉ. ढेकळे

जत,(प्रतिनिधी)-
राष्ट्रीय सेवा योजना हे समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक, सामाजिक व राष्ट्रीय दायित्वाच्या दृष्टीने प्रगल्भ बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना ही भेदाभेद अमंगळ आहे ही शिकवण देणारी योजना आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.व्ही.एस. ढेकळे यांनी केले.
   जत येथील राजे रामराव महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या  कोसारी (या.जत) येथे संपन्न होणाऱ्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्धघाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीनिवास भोसले हे होते.

       प्रारंभी प्रास्ताविकात  कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एम. डहाळके यांनी आठ दिवसात होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करुन राष्ट्रीय सेवा योजना विभागाची मूळ संकल्पना स्पष्ट केली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना  न्यू इंग्लिश स्कुल(कोसारी)चे मुख्याध्यापक सुरेश सावंत म्हणाले, संस्कार घडविण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय. अलीकडे विद्यार्थीच्यात असणारी श्रमप्रतिष्ठा कमी होत चालली आहे. अशा शिबिरातून श्रमाचे महत्त्व पटवून विद्यार्थ्यांच्यावर श्रमाचे संस्कार केले जातात. म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर म्हणजे श्रम प्रतिष्ठेची कार्यशाळाच आहे, असेही ते शेवटी म्हणाले. तसेच यावेळी श्री. शहाजी चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय सेवा योजनेकडून आदर्श घेऊन कोसारी गाव सुजलाम सुफलाम होईल ही अपेक्षा व्यक्त केली.
        शिबिराच्या उद्घाटनासाठी जत पंचायत समिती सदस्या मा. सौ. अर्चना नाथाजी पाटील या प्रमुख पाहुण्या तर अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद सांगली चे माजी सदस्य श्रीनिवास रामचंद्र भोसले हे उपस्थित होते.
      या कार्यक्रमासाठी कोसारी गावचे सरपंच तानाजी बिसले, उपसरपंच बाळासो पवार, युवा नेते नाथाजी वसंत पाटील, विक्रम ढोणे, मा. बापू महारनूर, सुरेश खरात, साप्ताहिक 'कळवळा'चे सहसंपादक लतीफ मणेर, मुख्याध्यापक विनायक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते. या कार्यक्रमाप्रसंगी जत तालुका रासपचे अध्यक्ष किसन टेंगले यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकाना टीशर्ट भेट दिले.
      सदर शिबीरात १२५ स्वयंसेवक-स्वयंसेविका सहभागी झाले असून आठवडाभर कोसारी गावात 'स्वच्छ भारत-स्वस्थ भारत' अभियानांतर्गत ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, साक्षरता, गटचर्चा, सर्वेक्षण, लेक-वाचवा अभियान इ. विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. कृष्णा रानगर, प्रा. सौ. निर्मला मोरे, प्रा. गोविंद साळुंखे, प्रा. अशोक बोगुलवार, प्रा. हिरामण टोंगारे, डाॅ. शंकर गावडे, डाॅ. दिनकर कुटे, प्रा. संगीता देशमुख, प्रा. वसुंधरा खोत, प्रा. निकीता बोबडे कार्यरत राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीशकुमार पडोळकर यांनी  तर आभार  कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र लवटे यांनी मानले.

No comments:

Post a Comment