Thursday, February 14, 2019

प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने प्रकाश जमदाडे यांचा सत्कार

जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने भारतीय रेल्वेच्या पुणे विभागाच्या केंद्रीय समितीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री. जमदाडे यांनी  मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, मला खासदार संजय काका पाटील व आमदार विलासराव जगताप यांनी  फार मोठी जबाबदारी दिलेली असून त्याचा निश्चितच लोककल्याणासाठी करेन. यापूर्वीही मला ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्या वेळी मी त्याचा उपयोग जनकल्याणासाठी केल्याचे सांगितले .यावेळी सुद्धा नक्की चांगला उपयोग करून जत बरोबरच इतरही  रेल्वे प्रवाशांच्या सोयीच्या मार्गाविषयी सातत्याने पाठपुरावा करीन असा मनोदय व्यक्त केला.
 यावेळी शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष विनायक शिंदे यांनी सत्कार करताना जत तालुका रेल्वे मार्गापासून खूपच लांब असून विद्येचे माहेर घर असलेले पुणे व आपल्या राजधानीला जाण्यासाठी तालुक्यातील प्रवाशांना  सोयीस्कर होईल असे मार्ग आपल्या हातून व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाकडेही पंचायत समितीच्या माध्यमातून  लक्ष देण्याची मागणी केली.
यावेळी तालुका अध्यक्ष देवाप्पा करांडे, दिलीप पवार यांनी जमदाडे विविध प्रकारच्या प्रलंबित बिलासंदर्भात तक्रार मांडली. यावेळी  वित्त विभागातील लेखा अधिकारी श्री.आत्तार यांना बोलावून घेतले व याबाबत चर्चा केली. दोन महिन्यापूर्वी दिलेल्या 43 बिलांच्या रक्कमा उद्या केंद्रप्रमुख खात्यावर जमा होतील व सद्या शिक्षकाची 203 बिले गेले सहा महिने प्रलंबित आहेत. ही बिले 1 महिन्याच्या आत म्हणजे 15 मार्च पर्यंत केंद्रप्रमुख  खात्यावर कसल्याही परिस्थितीत  जमा केली जातील असे श्री. आत्तार यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या आठ दिवसात पंचायत समिती स्तरावरील अनेक प्रलंबित प्रश्नासंदर्भात सभापती, बिडीओ, गटशिक्षणाधिकारी यांच्या समवेत शिक्षक संघाची बैठक घेण्याचे आश्वासन प्रकाश जमदाडे यांनी देऊन शिक्षक संघाच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी सरचिटणीस सुरेश पाटील,जिल्हा उपाध्यक्ष बसवराज यलगार,फत्तू नदाफ,दिलीप पवार,जकाप्पा कोकरे,सुभाष शिंदे,नामदेव भोसले,कृष्णा तेरवे,नानासो पडुळकर, नामदेव नागणे, अशोक कदम,विठ्ठल कोळी, विठ्ठल जाधव,सीताराम यादव,दत्तात्रय वाघमारे, बाळासो साळुंखे, जैंनुदिन नदाफ,लक्ष्मण पवार,इरसिदप्पा किट्टद,संजय सोलनकर,मनोज वसावे,गुलाबसिग पावरा यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment