Saturday, February 2, 2019

विकास निधीला काँग्रेस नगरसेवकांचा विरोध

जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील विकास कामाच्या माध्यमातून आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी सत्ताधारी गटातील नगरसेवक दोन कोटी रुपयांच्या शासकीय निधीला खो घालण्याचा प्रयत्न करत आहेत,असा आरोप जत नगरपरिषद विरोधी गटनेते विजय ताड व नगरसेवक उमेश सावंत यांनी पत्रकार बैठकीत बोलताना व्यक्त केला.

    आमदार  विलासराव जगताप व खासदार संजय  पाटील यांच्या प्रयत्नातून जत नगरपालिकेसाठी दोन कोटी रुपयांचा विशेष निधी शासनाने मंजूर केला आहे. सदरचे काम बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणार असून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे .या कामासाठी नगर पालिका  प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे .परंतु हे प्रमाणपत्र देण्यासाठी  सत्ताधारी गटातील नगरसेवक विरोध करत आहेत असे सांगून ताड व सावंत पुढे म्हणाले की ,सदरचे काम नगरपालिकेमार्फत आपणच घेऊन त्यातून आर्थिक स्वार्थ साधता यावा या उद्देशाने या कामाला सत्ताधारी गटाकडून विरोध केला जात आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.
      तीन महिन्यापासून जत शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .नियमित स्वच्छता केली जात नाही. आरोग्य विभागातील कर्मचारी वेळेवर काम करत नाहीत . प्रशासनाचे त्यांच्यावर नियंत्रण राहिले नाही .त्यामुळे जत शहराला दुर्गंधीचे स्वरुप प्राप्त होत आहे. शहरातील कचरा  उचलण्याची निविदा काढण्यात आली होती . परंतु ती निविदा जाणीवपूर्वक मंजूर करण्यात आली नाही. सत्ताधारी गटातील एक नगरसेवक सदरची निविदा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते असा आरोप त्यांनी यावेळी केला.
    जत शहरालगत असलेल्या जनावरे आठवडा बाजाराच्या पाठीमागील जागेचे येणे करण्यासाठी  संबंधित जागामालकाने नगरपालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते . परंतु या आठ एकर  जागेवरील ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी आठ लाख रुपयांची मागणी करून अर्थपूर्ण व्यवहारातून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे.या प्रकरणाची चौकशी करून दोषी असणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी  विजय ताड व उमेश सावंत  यानी  केली आहे.

No comments:

Post a Comment