Monday, February 4, 2019

स्त्री-पुरुष समानतेचीआवश्यकता-प्रा.संजय काळे

जत,(प्रतिनिधी)-
स्त्री-पुरुष समानता ही फक्त कागदावर किंवा भाषणात असून गरजेचे नाही तर ती माणसाच्या मनात व कृतीत असावी व त्यासाठी मानसिक स्वच्छता महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन प्रा.संजय काळे यांनी केले.
      जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कोसारी (ता.जत) येथे सुरू असलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबीरात 'लेकीचा जागर' या स्त्रीभ्रूणहत्या विरोधी व्याख्यानात बोलताना केले.

       यानंतर अपघातासमयी महत्वपूर्ण असणाऱ्या प्रथमोपचार  संबंधी माहिती डॉ.भरत हेसी व डॉ. शुभांगी गुरव यांनी प्रात्यक्षिकाद्वारे दिली. एखाद्या अपघातग्रस्त व हृदयविकाराचा झटका आलेल्या पेशंटला मृत्यूच्या दाढेतून कसे वाचवायचे याबद्दल माहिती दिली व विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण केली.
    शिबिराच्या दुसऱ्या सत्रात महिलांसाठी खास हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये गावकरी महिलांनी सहाभाग घेऊन उखण्याचा मनोरंजक कार्यक्रम सादर केला. सायंकाळी राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) चे सांगली जिल्हा विभागीय समन्वयक प्रा. सदाशिव मोरे यांनी भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करताना प्रा. मोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा कृती कार्यक्रम विद्यार्थ्यासमोर मांडला.
   कार्यक्रम अधिकारी डाॅ. राजेंद्र लवटे अध्यक्षस्थानी होते. यावेळी सरपंच  तानाजी बिसले व उपसरपंच  बाळासो पवार, प्रा. कृष्णा रानगर, प्रा. सौ. निर्मला मोरे, प्रा. संगीता देशमुख, ग्रामस्थ, स्वयंसेवक-स्वयंसेविका उपस्थित होते. आभार कार्यक्रम अधिकारी डाॅ. भिमाशंकर डहाळके यांनी मानले.

No comments:

Post a Comment