Thursday, February 28, 2019

सांगली जिल्ह्यात होणार 862 प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांची भरती


सांगली,(प्रतिनिधी)-
 प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या 627, उर्दू शिक्षक 19, कन्नडचे 13, तर माध्यमिक शिक्षकांच्या 203 जागा भरल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवित्र पोर्टलचे उदघाटन केल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली.
गेली अनेक दिवस प्रतीक्षेत असणारी शिक्षक भरती अखेर सुरू झाली आहे. राज्यातील 10 हजारांहून अधिक जागा भरण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद मराठी उपशिक्षक 481, पदवीधर 101, उर्दू उपशिक्षक 8, पदवीधर 11, कन्नड उपशिक्षक 7, पदवीधर 6 अशा जागा भरण्यात येणार आहे. 48 संस्थांमधील 203 माध्यमिक शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये इयत्ता पाचवीची 26 पदे, सहावी ते आठवी 58 पदे, नववी ते दहावी 75 पदे, अकरावी ते बारावी 44 पदे अशी एकुण 203 पदे भरण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment