जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने संत रोहिदास जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जत येथील बुद्धविहार येथे हा कार्यक्रम पार पडला.
जत नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे ,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सनमडीकर यांच्याहस्ते संत रोहिदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी बोलताना श्री.कांबळे म्हणाले की, समाजात शांतता निर्माण होण्यासाठी संत रोहिदास यांनी प्रयत्न केले तर शिवाजी महाराजांनी रयतेला प्राधान्य देऊन स्वराज्य निर्माण केले.समाजाने त्यांच्या पावलावर पाऊल टाकून देशाला वैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक रवी सांगोलकर यांनी केले तर आभार इब्राहिम नदाफ यांनी मानले. यावेळी मच्छिंद्र ऐनापुरे, अनिल मिसाळ,अर्जुन कुकडे, दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment