Monday, February 4, 2019

म्हैसाळच्या पाण्यासाठी पूर्व भागातील 44 गावे लोकसभेवर बहिष्कार टाकणार

जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या जत तालुक्यातील 44 गावांमधील  संतप्त नागरिकांनी म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी लोकसभा व विधानसभेवर  बहिष्कार  टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या परिसरातील सर्वपक्षीय नेते आणि सरपंच मंडळींनी घेतला आहे.

     म्हैसाळ योजनेतून माडग्याळ सह आठ गावाला गुड्डापूर , संख , दरीबडची , तिल्याळ, सिद्धनाथ मोटेवाडी.तिकोंडी हे तलाव भरण्यासाठी अखेर शिवसेनेच्या प्रयत्नातून सर्व्हेक्षनाचे झाले असून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे.म्हैसाळ योजनेतून माडग्याळसह आठ गावाना वगळण्यात आले होते .पाण्याची तीव्र टंचाई असलेमुळे गुड्डापूर , संख , दारीबडची , तिल्याळ, सिद्धनाथ , मोटेवाडी , तिकोंडी हे तलाव भरण्यासाठी अखेर शिवसेनेच्या वतीने प्रयत्न करण्यात आले होते .शिवसेनेच्या प्रयत्नातून सर्व्हेक्षणाचे काम झाले आहे.येत्या काही दिवसात अंदाजपत्रक तयार करणार असून शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेचे जलसंपदा मंत्री विजय
शिवतारे,कृष्णा खोरे उपाध्यक्ष  नितीन बानुगडे पाटील यांच्या पुढाकाराने काम चालू झाले असल्याने जिल्हा प्रमुखांना सोबत घेवून पुढील काम गतीने होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जत तालुका प्रमुख अंकुश हूवाळे यांनी सांगितले . तालुक्याच्या पूर्व भागाला लवकरच पाणी मिळावे यासाठी संख येथील हभप तुकाराम बाबा महाराज यांचे मंगल कार्यालयात एकत्रित येऊन निर्णय घेण्यात आला.
 यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख तम्मा कुलाळ व शिवसेना तालुका प्रमुख अंकुश हुवाळे, शेतकरी संघटनेचे चंद्रकांत रेबगोंड हे उपस्थित होते . म्हैसाळ योजनेतून जत पूर्व भागाला लवकरच पाणी मिळणार असून सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित खोद कामाचे तात्काळ नियोजन करून बजेट मध्ये आर्थिक तरतूद करावी अशी मागणी अनेक सरपंचांनी यावेळी केली.
येणाऱ्या काळात हभप तुकाराम  महाराज यांची भूमिका त्यांच्या प्रयत्नांनी निर्णायक ठरणार आहे, पूर्व भागासह तालुक्यात महाराजाना मानणारे बहुसंख्य अनुयायी आहेत, त्यांनी एकदा या कामात पुढाकार घेतला म्हणजे आर या पार ची लढाई करणार यात शंका नाही त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील काम गतीने होण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जत तालुका शिवसेना प्रमुख अंकुश हूवाळे यांनी दिले, या बैठकीस संजय धुमाळ, हिंदुराव शेडगे,दत्ता पारोळकर,लिंबाजी माळी, जेटलींग कोरे,सिद्दु गायकवाड,तुकाराम कोरे,निंगु पाटील,श्रीमंत करपे,अमर कांबळे,नितीन शिंदे यांच्यासह सरपंच उपसरपंच सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
(म्हैसाळ च्या पाण्यासाठी जत पूर्व भागातील 44 गावे आगामी निवडणूकावर बहिष्कार टाकणार-हभप तुकाराम बाबा महाराज)

No comments:

Post a Comment