Sunday, February 17, 2019

पुलवामातील अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा येळवीत निषेध


जत,(प्रतिनिधी)-
येळवी ग्रामपंचायत व ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्था यांच्यावतीने काश्मीर मधील पुलवामा येथे  झालेल्या अतिरेक्याच्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व  भ्याड अतिरेकी हल्ल्याचा तसेच पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी  'भारत माता की- जय', 'वीर जवान अमर रहे-अमर रहे' अशा घोषणा देण्यात आल्या , त्याचबरोबर  पाकिस्तानचा निषेध म्हणून 'पाकिस्तान मुर्दाबाद-मुर्दाबाद' अशाही घोषणा देवून  निषेध करण्यात आला.

 यावेळी सरपंच विजयकुमार  पोरे, उपसरपंच  सुनील अंकलगी, संस्थेचे अध्यक्ष दीपक अंकलगी ग्रा.पं. सदस्य तथा सचिव संतोष पाटील,उपाध्यक्ष संतोष स्वामी, सुुरेश आवटे, राजकुमार धोत्रे,महादेव जाधव, नवनाथ तेरवे,  आदित्य अंकलगी,  नवनाथ पवार ,शशिकांत गानमोटे, सुभाष चव्हाण,बजरंग चव्हाण ,चंद्रकांत खंडागळे , राजू कोळी, याचबरोबर माजी सैनिक वसंत पवार, राजू शिंदे,  कृष्णदेव खंडागळे, महादेव खंडागळे, वसंत भंडे, रवींद्र पाटील आदी माजी सैनिक  विशेष करून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने  उपस्थित  होते.

No comments:

Post a Comment