जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील कोसारी गावामधून 2017-2018 या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या विमा व्यवसायामुळे कोसारीला विमा ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराच्या 75 हजार रुपयांचा बक्षिसाचा धनादेश एलआयसीतर्फे शाखाधिकारी शशिकांत दाभाडे यांच्या हस्ते सरपंच तानाजी बिसले, उपसरपंच बाळासाहेब पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या बक्षीस रकमेतून गावामध्ये पाण्याची टाकी बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यावेळी विमा ग्राम सन्मान दर्शवणाऱ्या फलकाचे उदघाटन राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एस. ढेकळे यांच्या हस्ते करण्यात आले.

राजे रामराव महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने सर्वांचे स्वागत व सत्कार केले. ग्रामपंचायत कोसारी आणि एल आय सी शाखा जत यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एलआयसीचे विकास अधिकारी उमेश थोरात यांनी कोसारी गावाचे विमा ग्राम झाल्याबद्दल अभिनंदन केले व ग्रामस्थांनी पुन्हा एकदा प्रयत्न करून विमा ग्रामचे बक्षीस पुढच्या वर्षीही मिळवण्याचे आवाहन केले.
वैभव तोरवे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि. प. सदस्य श्रीनिवास भोसले यांनी गावाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला.
राजे रामराव महाविद्यालयाचे पडोळकर सर यांनी सूत्रसंचालन केले.
कोसारी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश सावंत, रासप तालुका अध्यक्ष किसन टेंगले, लतिफ मणेर, दादासो महारनुर, विक्रम तोरवे, संभाजी टेंगले, सुरज तोरवे, नवनाथ टेंगले, गोपाळ साळे, विशाल सोनी, विनोद काबळे, बाबुराव मोरे शंकर तोरवे,महेश तोरवे, राजे रामराव महाविद्यालयाचे लवटे, मोरे, श्रीमती मोरे, सौ.माने पाटील आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.
No comments:
Post a Comment