Thursday, February 7, 2019

अंधश्रद्धेचे भूत मनातून गाडून टाका-प्रा.माने-पाटील

जत,(प्रतिनिधी)-
आज विज्ञानाच्या  युगातही अंधश्रद्धेचे भूत प्रत्येकाच्या मनात कायम असून त्याला गाडून  टाका, असे प्रतिपादन प्रा. सी. वाय. माने-पाटील यांनी राजे रामराव महाविद्यालयाच्या कोसारी (ता. जत) येथे सुरु असलेल्या विशेष श्रमदान शिबीरातील व्याख्यानात केले. निरीक्षर लोकांबरोबर सुशिक्षित लोक ही अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. खेड्यातील अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन तरूण पिढीने करावे असे आवाहन केले.

यावेळी देवऋषी ,भोंदू बुवा-बाबा लोकांना कसे फसिवतात, याची अनेक प्रात्यक्षिके त्यांनी दाखवून उपस्थितांचे उदबोधन केले.प्रारंभी  जत 'अंनिस'चे कार्याध्यक्ष इब्राहीम नदाफ यांनी मनोगत व्यक्त करताना वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येकाने बाळगावा असा आग्रह धरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोसारी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक विनायक शिंदे यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाला गावचे उपसरपंच बाळासो पवार, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र लवटे, प्रा. कृष्णा रानगर, प्रा. डॉ. बी. एम. डहाळके, सदस्य प्राध्यापक, ग्रामस्थ व शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment