Monday, February 25, 2019

जतमध्ये निरंकारी मंडळाच्यावतीने स्वच्छता अभियान उत्साहात

जत,(प्रतिनिधी)-
        संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन शाखा जतच्या वतीने सदगुरु बाबा हरदेवसिंह महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त जत येथील शासकिय ग्रामीण रुग्णालय, राम मंदिर परिसर, एस्.आर.व्ही.एम्.हायस्कुल मैदान, तहसिल कार्यालय मैदान इत्यादी ठिकाणी स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबवण्यात  आले.शासकिय रुग्णालयाच्या  आतील भागातील सगळे वार्ड व बाहेरील संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.शिवाजी चौक ते जत कोर्ट पर्यंतचा दुतर्फा रस्त्याचीही सफाई करण्यात आली.

   कार्यक्रम प्रसंगी जत नगरपरिषद च्या नगराध्यक्ष सौ. शुभांगी बन्नेनवर यांनी स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की निरंकारी मंडळाप्रमाणे प्रत्येक मनुष्याने निष्काम भावनेने स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला तर आपला संपूर्ण भारत देश स्वच्छ झालेशिवाय राहणार नाही.स्वतःपासुन व मनापासुन सर्वांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेऊन या कार्यांमध्ये सहभागी झालेस   आपले मन‌ ही पवित्र व स्वच्छ होईल. 
   यावेळी शाहीर रामभाऊ हेगडे यांनी स्वच्छतेविषयीचा पोवाडा सादर करुन स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. शाखेचे जोतिबा गोरे यांनी मंडळाच्या आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमाबाबत माहिती दिली.
 ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.अभिजित पवार व डॉ.साबळे यांनी रुग्णालयाची स्वच्छता केलेबद्दल निरंकारी मंडळाचे आभार व्यक्त केले.
   अभियानास सेवादल, संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशनचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे नियोजन जत शाखेचे प्रमुख
जोतिबा गोरे यांचे मार्गदर्शनाखाली सेवादल संचालक संभाजी साळे, माजी नगरसेवक गिरमल कांबळे, संज्योति साळुंखे, जालिंदर सांगोलकर,अशोक माळी, सुभाष माने यांचेसह संत महापुरुष व सेवादल यांनी केले.

No comments:

Post a Comment