(या बातमीला फोटो आहे. कोळी समाजाच्या वधू-वर मेळाव्याप्रसंगी वाल्मिकी प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर )
जत,( प्रतिनिधी)-
कोळी समाजातला तरुण जातीचे दाखले मिळत नाहीत म्हणून बेरोजगार होत आहेत. अशांना समाजातील प्रतिष्ठित लोकांनी बँका,पतसंस्था काढून व्यवसाय करण्याकरता कर्जे उपलब्ध करून द्यावीत असे प्रतिपादन शंकर बटगेरी (सोलापूर) यांनी जत येथे बोलताना केले.
जत येथील रेणुका बहुऊद्देशीय संस्थेच्यावतीने कोळी समाजाचा वधू-वर व पालक मेळावा जत येथील शिवानुभव मठात आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी शंकर बटगेरी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे अरुण कोळी होते. प्रमुख उपस्थिती जतचे नगरसेवक महादेव कोळी, संतोष उर्फ सायबा कोळी, गणेश कोळी, सेवानिवृत्त पोलीस आधिकारी खंडू कोळी,मुख्याध्यापक आबासाहेब कोळी (जयसिंगपूर ) आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत बी.टी. कोळी (संबरगी) यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन आण्णू प्रभू कोळी यांनी तर सूत्रसंचालन चंद्रकांत कोळी यांनी केले. आभार प्रदर्शन महादेव कोळी यांनी मानले.
No comments:
Post a Comment