Wednesday, February 27, 2019

आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा


उन्हाळ्यात घ्या समतोल आहार
जत,(प्रतिनिधी)-
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा हळूहळू चढू लागल्याने उन्हाचा चटकाही वाढत आहे. ऋतुमानात बदल झाला तर त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. मात्र शाळा, महाविद्यालय आणि कामानिमित्त रोजच बाहेर पडणार्‍यांना उन्हाळा सुसह्य करण्यासाठी समतोल आहार आणि रस्त्यावरचे पदार्थ खाण्याचे टाळणे या गोष्टी योग्य ठरणार आहेत. शिवाय सकाळी लवकर कामाचा निपटारा करून सावलीत राहणेदेखील लाभाचे असणार आहे.

उन्हाळा सुरू झाला की, ज्युस केंद्रे,गाड्या रस्त्याकडेला लागतात. मात्र या रस्त्यावरच्या पेयांचे सेवन आरोग्याला घातक ठरणारे आहे. कारण या रस्त्यावर मिळणार्‍या ज्यूसमध्ये फ्लेवरींग एजंट मिसळला जातो.प्रामुख्याने फायनॅपल,मँगो,स्ट्रॉबेरी या फ्लेवरमध्ये त्याचा वापर होतो.
अस वगैरे पिताना काचेच्या ग्लासांचा वापर केला जातो, मात्र ते स्वच्छ धुतले जात नाहीत, असा सर्व ठिकाणचा अनुभव आहे. गर्दीच्या ठिकाणी फक्त पाण्यात बुचकळण्याचे काम केले जाते. त्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.त्यामुळे काचेच्या ग्लासात रस पिणे टाळायला हवे.त्याऐवजी यूज अ‍ॅण्ड थ्रो ग्लास वापरावेत.
बंद पेटीत शीतपेये वापरण्याचा प्रकार वाढला आहे.मात्र वैद्यक शास्त्रानुसार सांगण्यात येते की, बंद पेटीतील शीतपेयांमध्ये एमटी कॅलरीज असतात. त्यातून केवळ साखर मिळते. ती वेळीच खर्च केली जात नाही. त्यामुळे मधुमेह,हृदयरोगाला आमंत्रण मिळते. त्याऐवजी नैसर्गिक कोकम, लिंबू सरबत, ताक याचा वापर केलेला चांगला आहे. त्यामुळे त्यांची पचन व्यवस्थेला मदत होते.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्यात आजारी पडायचे नसेल तर पहिल्यांदा आपल्या भोजनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उन्हाळ्यात फार जेवण अशक्य आहे. मात्र या काळात प्रामुख्याने साधे आणि ताजे अन्न्य घ्यायला हवे आहे. पाण्यात शिजवलेल्या पदार्थांना कालमर्यादा असते. त्यामुळे शक्यतो ताजे अन्न खाण्याचा प्रयत्न करायला हवे.
उन्हाळ्यात तहान लवकर लागते. त्यामुळे पाणीही भरपूर लागते. वातावरणातील बदलामुळे शरीरातील द्रव पदार्थ आणि क्षार पदार्थ कमी होतात. त्यामुळे अनेकांना डिहायड्रेनचा त्रास होतो. ही कमतरता भरून काढण्यासाठी आपाण्याचा अंश जास्त असलेले पदार्थ वाढवले पाहिजेत. लिंबू सरबत,साखर आणि मीठ टाकलेले भरपूर पाणी प्यायला हवे. तसेच उन्हातून आल्यानंतर लगेचच फ्रिज अथवा कूलरचे अतिगार पानी पिऊ नये.
उन्हाळ्यात काही गोष्टीत खबरदारी घेतली की, काहीच वाटणार नाही. त्यामुळे सकाळी उपाशी पोटी बाहेर पडू नका, शिवाय दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळायला हवे. गडद, घट्ट आणि जाड कापड घालण्याचे टाळायला हवे. तापमान जास्त असल्यास श्रमाची कामेदेखील टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. मोकळ्या खिडक्या,दारे उघड्या ठेवतात. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्यास कारणीभूत असलेला चहा,कॉफी,मद्य आणि कार्बोनेटेड थंडपेये यांचा वापर टाळ्याला हवा. आणि बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत घेऊन जायला हवे. 


No comments:

Post a Comment