Wednesday, February 20, 2019

आरोग्य शिबिरासाठी राबणाऱ्या आशा सेविकांना आता मानधन

जत,(प्रतिनिधी)-
जिल्हा परिषदने आरोग्य महाशिबिरात सहभागी होणाऱ्या आशा स्वयंसेविकांंना जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून दीडशे रुपये देण्याचा ठराव नुकताच आरोग्य समितीच्या सभेत घेण्यात आला आहे. यामुळे साहजिकच आशा स्वयंसेविकांना दिलासा मिळाला आहे .याबाबत महाराष्ट्र आशा ,गटप्रवर्तक युनियन सांगली  (CITU संलग्न) यांनी वारंवार पाठपुरावा केल्याने आशा स्वयंसेविकांना न्याय मिळाला आहे.

      सांगली जिल्हा परिषदेअंतर्गत आता पर्यंत आरोग्य महाशिबिरे आयोजित करण्यात आली होती.  या आरोग्य महाशिबिरात आशांना एक रुपयादेखील मानधन दिले जात नव्हते .याबाबत महाराष्ट्र आशा ,गटप्रवर्तक युनियन (CITUसंलग्न ) ने आपल्या न्याय हक्कासाठी मानधन मिळणे बाबत निवेदन देऊन पाठपूरावा केला सोमवारी झालेल्या आरोग्य समिती सभेमध्ये जिल्हा परिषद स्वीय निधीतून आरोग्य शिबिरे आयोजित केले जातात .एका शिबिरासाठी आशा स्वयंमसेविकांना दिडशे रुपये मानधन सन 2019-20  या चालू आर्थिक वर्षापासून देण्याचे ठरवले आहे.
     सदर न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य आशा, गटप्रवर्तक युनियन (CITUसलग्न)चे जिल्हा अध्यक्षा कॉम्रेड मीना कोळी, जिल्हा सचिव कॉम्रेड उमेश देशमुख, जिल्हा संघटक कॉम्रेड हणमंंत कोळी, जिल्हा सदस्य सुरेखा जाधव ,अंजू नदाफ,शबाना आगा,सुवर्णा शिंदे, अनुपमा गौंड,मनिषा महामुनी, सचिता माने, सीमा गायकवाड,विना नलवडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment