सांगली,(प्रतिनिधी)-
चाकूचा
धाक दाखवून व बेशुध्दीच्या गोळ्या खाण्यास भाग पाडून आतेबहिणीवर बलात्कार करणारा आरोपी
सचिन वसंत कांबळे (वय 30, भारत सूतगिरणी,
कुपवाड) याला गुरुवारी सांगली कोर्टाने दहा वर्षे
सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा
आणि सत्र न्यायाधीश पेरमपल्ली यांनी दिला. सरकारी वकील म्हणून
आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले. कुपवाड नजीकच्या बामणोलीत पीडित मुलगी मावशीच्या घरी राहत आहे.
पीडितेच्या माता-पित्यांचे छत्र हरपल्याने मावशीच तिचा
सांभाळ करते. आरोपी सचिन कांबळे हा घरे रंगविण्याचे काम करत होता.
मावशीने आपले नवीन घररंगविण्याचे काम त्याला दिले होते. दि. 10 जून 2017 रोजी नातेवाईकांचे
लग्न असल्याने मावशी तिकडे गेली होती. त्यावेळी पीडित मुलगी घरात
एकटीच असल्याची संधी साधून आरोपीने रंगाचे डबे उघडण्याच्या चाकूने पीडितेला धमकावून
तिच्यावर बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची
धमकी दिली. त्यानंतर दि. 13 जून
2017 रोजीही आरोपीने पीडितेला गोळ्या देऊन बेशुध्द करुन तिच्यावर लैंगिक
अत्याचार केला. त्यानंतर तो पीडितेच्या तोंडावर पाणी मारून तिला
शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करत असतानाच पीडितेचा मामा घरी आला. आरोपीने काहीही न बोलता तेथून पळ काढला. पीडितेने घडलेला
प्रकार सांगितल्यानंतर आरोपीविरुध्द कुपवाड एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करून आरोपीला
गजाआड करण्यात आले होते. कोर्टाने आता त्याला दहा वर्षे सक्त
मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
No comments:
Post a Comment