जत,(प्रतिनिधी)-
डफळापूर ( ता.जत ) येथे विहीरीतील गाळ यारीने काढत असताना चानक यारीचा बेल्ट तुटून झालेल्या अपघातात सुनील रामकृष्ण परीट ( वय- ४० रा.डफळापूर ) या शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित चोथे यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की , डफळापूर गावालगत असलेल्या तानाजी लव्हाजी पाटील यांच्या विहीरीतील गाळ काढण्याचे काम मागील चार दिवसापासून सुरू आहे. आठ शेतमजूर येथे काम करत होते. गाळ काढण्याचे काम सुरु असताना यारीचा बेल्ट आचानक तुटल्यामुळे यारीचा डबा चाळीस फुट खोल विहिरीत आदळला त्यामुळे डब्यात बसून वरती येत असलेले सुनील परिट याना जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यु झाला . तर त्यांच्या सोबत असलेले मानतेश महादेव परिट ( वय २० रा.डफळापूर ) हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा उजवा पाय मोडला आहे. उपचारासाठी त्यांना मिरज येथे पाठविण्यात आले आहे.
डफळापूर येथील तानाजी लव्हाजी पाटील यांच्या विहीरीत मागील चार दिवसापासून गाळ काढण्याचे काम सुरु आहे, आज सकाळ पासुन यारीतून मजुर गाळ काढत होते. सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान लघुशंकेसाठी सुनिल व मानतेश यारीच्या डब्यात बसून विहीरीतून वर येत असताना अचानक यारीचा बेल्ट तुटला व तो डबा चाळीस फुट खोल विहीरीत खाली पडला यावेळी जबर मुका मार लागून शरीरातील नसा तुटल्यामुळे सुनील याचा जागीच मृत्यु झाला.तर मानतेश महादेव परीट याचा उजवा पाय मोडला आहे. त्याला मिरज येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हावलदार सचिन हाक्के करत आहेत.
No comments:
Post a Comment