Monday, February 18, 2019

जतमधल्या दोघा चंदन तस्करांना कर्नाटकात अटक

जत,(प्रतिनिधी)-
कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर चंदन भरून जत तालुक्यातून बागलकोट जिल्ह्याकडे जाताना ऐगळी पोलिसांनी सापळा रचून मारुती कारवर छापा टाकून 2 क्‍विंटल चंदन जप्त केले आणि दोघा चंदन तस्कारांच्या मुसक्या आवळल्या.

महाराष्ट्रात नोंदणी असलेल्या मारुती कारमधून तौसिफ मुल्ला (वय 28) आणि तुकाराम कैकाडी (वय 55, दोघेही रा. रावळगुंडवाडी, जत) हे दोघे चंदनाची लाकडे घेऊन जात असल्याची माहिती ऐगळी पीएसआय राकेश बगली यांना मिळताच तेलसंग गावात त्यांनी साध्या वेशात सापळा रचला आणि कार येताच, तपासणी करताच कारच्या डिकीत पांढर्‍या पोत्यात चंदनाच्या लाकडाचे तुकडे आढळले.
आरोपींनी चंदनाची लाकडे चिकलगी क्रॉस जिल्हा बागलकोट येथे घेऊन जात असल्याची कबुली दिली. दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत महांतेश खोत, बसवराज ढवळेश्‍वर यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment