Friday, February 15, 2019

आपल्या गावाचे नाव होईल असे काम करा:प्रतीक पाटील

(एकुंडी (ता.जतयेथील न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील.)
जत,(प्रतिनिधी)-

विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी. आपल्या आवडी जपाव्यात आणि आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी जत तालुक्यातील एकुंडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बळवंत यमगर होते.

मंत्री पाटील म्हणाले की, शिक्षणाचा प्रसार झाल्याने गावातल्या मुलांचे शिक्षणासाठीचे कष्ट कमी झाले. मुली लहान वयातच लग्न होऊन सासरी जायच्या थांबल्या आणि शिक्षण घेऊ लागल्या. यामुळे सुशिक्षित पिढी निर्माण होण्यास मदत झाली आहे.  विद्यार्थ्यांनी कष्ट, मेहनत घेऊन गावाचे नाव उज्ज्वल करावे.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक कृष्णदेव पाटोळे यांनी केले. यावेळी त्यांनी आतापर्यंतच्या शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी सरपंच बसवराज पाटील, प्रा. राम पाटील, संजय हजारे, धनाजी पाटील, बसगोंडा कोट्टलगी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या तसेच आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थींनींचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन आय.पी. चौगुले यांनी केले. या कार्यक्रमाला बसगोंडा नाईक, गोपाळ म्हेत्रे, मुख्याध्यापक अंकुश नाईक, मलगोंडा हेळकर,उपसरपंच सरोजिनी कोरे, महादेव पाटील, मलगोंडा नाईक, महादेव पाटील, कृष्णदेव पाटोळे, आय.पी. चौगुले, विकास मोटे, संभाजी ओलेकर, लता वाघमारे, गदन्नावर, विष्णूदेव चौगुले, एकुंडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र ऐनापुरे, गुडोडगीवस्तीचे मुख्याध्यापक संभाजी सुतार यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment