जत,(प्रतिनिधी)-
घरगुती वादातून जत तालुक्यातील जालिहाळ बुद्रुक येथे हणमंत शंकर माने यांचा लाकडी दांडक्याने डोक्यात मारून खून करण्यात आला. या प्रकरणी आमगोंडा कोडगानूर यांच्या विरोधात उमदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
जलिहाळ बु।। येथील मयत हणमंत शंकर माने व संशयित आरोपी आमगोंडा कोडगानुर यांच्यात वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी गावातील पांडू भोसले ,सिद्धू भोसले, सिद्धू बिराजदार व मलकू पुजारी आदी मंडळी बसली होती. चर्चा चालली असताना अचानक आमगोंडा कोडगानुर यांनी लाकडी दांडक्याने मयताचे डोकीत मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले. हणमंत शंकर माने हा मारहाणीत जागीच ठार झाला.
मयत हणमंत याचा भाऊ रमेश महादेव माने यांनी उमदी पोलीसठाण्यात फिर्याद दिली आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे हे करीत आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपीस उमदी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक श्री.संपागे , पोलीस कर्मचारी श्री.कुंभारे ,पोलीस हवालदार दिघे, श्री. भिसे, सचिन आटपाडकर,श्रीशैल वळसंग, पो का चौगुले, यांनी संशयित आरोपीस पकडून तपासकामी ताब्यात घेतला आहे सदर ठिकाणी मा उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत अनिकेत भारती यांनी भेट दिली आहे
No comments:
Post a Comment