Saturday, February 23, 2019

जंगम समाजाला ओबीसीचे दाखले मिळावेत

(जंगम समाजास लिंगायत ऐवजी ओबीसी दाखले मिळावेत यासाठी खासदार संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले.)
जत,(प्रतिनिधी)-
जंगम समाजास ओबीसी दाखले मिळावेत अशी मागणी सांगली जिल्हा जंगम समाज विकास संस्थेच्या जत शाखेच्यावतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन खासदार संजय काका पाटील यांना देण्यात आले. यावेळी आमदार विलासराव जगताप, डॉ. रवींद्र आरळी, तम्मा सगरे, व भाजपचे नगरसेवक प्रविण वाघमोडे आदी उपस्थित होते.

जंगम समाजास ओबीसी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1967 पूर्वीचे महसूल व शैक्षणिक पुरावा सादर करणे बंधनकारक केले आहे.परंतू कांही जंगम समाज बांधव जंगम म्हणून महसूल व शैक्षणिक पुरावा मिळत नाही. कारण आमचा समाज हा अल्पसंख्यांक  व अशिक्षित असल्यामुळे शाळेत नांव नोंदविताना हिंदू लिंगायत अशी जात नोंद केल्यामुळे सध्या जात प्रमाणपत्र म्हणजेच जातीचा दाखला मिळत नाही.
तरी सध्या त्यांचेकडे उपलब्ध असलेला कागदोपत्री पुरावा व  जंगम असल्याबाबतचे प्रतिनपत्र तसेच स्थानिक पातळीवर जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, सरपंच, गावकामगार तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तसेच आमच्या जंगम समाज संघटनेकडून दिलेले जात प्रमाणपत्र व स्थानिक पातळीवर चौकशी करून त्या आधारे जंगम समाजातील नागरिकांना ओबीसी (जंगम -58) जात प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी निवेदन देताना महादेव स्वामी, दयानंद मठ, मल्लिकार्जुन हिरेमठ, गिरीश स्वामी, ईरय्या हिरेमठ, विवेकानंद मठपती, परय्य मठपती, मल्लय्या स्वामी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment