Thursday, February 28, 2019

सुगंधी तंबाकूचा 1 लाख रुपयाचा अवैध साठा जप्त

जत,(प्रतिनिधी)-
 जत शहरातील निगडी कॉर्नर चौक येथील सागर टोबॅको अँड जनरल स्टोअर्स या दुकानावर सांगली येथील अन्न व औषध प्रशासन निरीक्षक सतिश सुभाषराव हाक्के  यांनी अचानक छापा घालून १ लाख ६ हजार ५५ रुपयाची  ८७ कीलोग्राम सुगंधी तंबाखू जप्त करून दुकानाचे मालक विश्वेश्वर महादेव कोरे ( वय ४५  ) यांच्या विरोधात जत पोलिसात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही कारवाई मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली आहे. याप्रकरणी कोरे यांना अद्याप अटक करण्यात आली नाही.

    याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की , सागर टोबँको अँड जनरल स्टोअर्स या दुकानाच्या माध्यमातून विश्वेश्वर कोरे सुगंधी तंबाखू विनापरवाना विक्री करत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन सांगली विभागाचे निरीक्षक सतीश सुभाषराव हाक्के यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या इतर  सहकारी कर्मचाऱ्यासमवेत मंगळवारी दुपारी  अचानक दुकानावर छापा टाकून दुकानाची झडती घेतली असता रत्ना , विमल ,कोल्हापूरी , गोवा,  स्टार पानमसाला इत्यादी कंपनीचा ८७ किलो  सुगंधी तंबाखूचा साठा दुकानात मिळून आला . सदरची सुगंधी तंबाखू जप्त करून विश्वेश्वर  महादेव कोरे यांना ताब्यात घेऊन आज सायंकाळी जत पोलिसात त्यांच्या विरोधात सतीश हाक्के यानी  फिर्याद  दाखल करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी कोरे यांना अद्याप अटक करण्यात आली नाही . या प्रकरणाचा पुढील तपास जत  पोलिस करत आहेत.

No comments:

Post a Comment