Wednesday, February 27, 2019

कलेचा असाही उपयोग


समाजातल्या वंचितगरीब घटकातल्या मुलांकडे गुणवत्ता असते. कौशल्यं असतात. पण त्यांच्या या गुणवत्तेला व्यासपीठ मिळत नाही. ही गुणवत्ता जगासमोर येत नाही. सतरा वर्षांचा मानव केडिया या मुलांच्या गुणवत्तेला व्यासपीठ मिळवून देतोय.

समाजातल्या गरीबवंचित घटकांसाठी काहीतरी करावंअसं अनेकांना वाटत असतं. पण नेमकं कायहे कळत नाही. सतरा वर्षाच्या मानव केडियाने याबाबतीत एक पाऊल पुढे टाकलंय. वंचित मुलांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी त्याने एक वेबसाईट तयार केलीये. या मुलांनी काढलेली चित्रं या साईटवर विक्रीसाठी ठेवली जातात. मानवला चित्रकलेची प्रचंड आवड. दहावीनंतर त्याने कला शाखा निवडली. चित्रकलेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा त्याचा कायम प्रयत्न असतो. मानवने सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतलंय. नवी दिल्लीतल्या 'परवाह'नावाच्या एनजीओचा तो सदस्य आहे. गरीब घटकांतली मुलं आणि महिलांसाठी ही संस्था काम करते. या एनजीओच्या जयपूर शाखेच्या नियोजन आणि अंमलबजावणी विभागाचा प्रमुख म्हणून तो कार्यरत आहे. 
या मुलांना तो चित्रकलेचे धडे देतो. मग त्यांची चित्रं वेबसाईटवर अपलोड केली जातात. या चित्रांची विक्री होते. यातून मिळालेले पैसे मुलांचं शिक्षण तसंच इतर गरजा भागविण्यासाठी वापरले जातात. या साईटवर तो स्वत:ची चित्रंही विक्रीसाठी ठेवतो. मुलांच्या चित्रांच्या किंमती ५00 ते १५00 रूपयांपर्यंत असतात. याबाबत मानव सांगतो कीमाझ्या चित्राला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी डिजिटल माध्यमाच्या शोधात होतो. यासोबतच वंचित घटकातल्या मुलांच्या चित्रांनाही व्यासपीठ मिळवून द्यायचं होतं. त्यामुळे अशी साईट तयार करण्याची कल्पना मला सुचली. या माध्यमातून मुलांच्या भविष्यासाठी तसंच इतर सामाजिक कार्यासाठी निधी गोळा करता येईलअसा माझा उद्देश आहे. 
दहावीनंतर मानव पुढचं शिक्षण घेऊ शकला असता. पण त्याने कलेतच करिअर करायचं ठरवलं. आपला जास्तीत जास्त वेळ तो या कलेला देतो. आपली कला त्याने स्वत:पुरती र्मयादित ठेवली नाही. तर ती इतरांपर्यंत पोहोचवण्याचं त्याने एवढय़ा लहान वयात ठरवलं. आपलं आयुष्य चांगल्या कामांसाठी खर्च व्हावंअसं मानवला वाटतं. याच विचाराने तो झपाटला आहे. 
त्याच्या साईटला सगळ्याच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळतोय. बरंच कौतुकही होतंय. त्यातच चित्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांना वाचाही फोडली जातेय. विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या ज्चित्रांची किंमत नाममात्र आहे. सामाजिक कार्याला हातभार म्हणून ही चित्रं खरेदी करता येतील. आपल्या कलेच्या माध्यमातून इतरांचं आयुष्य बदलण्यासाठी झटणार्‍या मानवचा आदर्श आपण प्रत्येकाने ठेवायला हवा.

No comments:

Post a Comment