प्रबोधनपर कार्यक्रमावर भर
जत,(प्रतिनिधी)-
जत येथील बहुजन समाज पार्टी, अखिल भारतीय संत रविदास समता परिषद आणि संत रविदास मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गुरु रविदास महाराज यांची ६२१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनेक प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
येथीलवडॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व स्टेडियम मार्ग, सांगली रोड येथे आयोजित या जयंती सोहळ्यासाठीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. अरविंद माळी (नागपूर) हे होते. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक चंद्रप्रकाश देगलूरकर (नांदेड), अशोकराव आगवणे (सोलापूर), प्रकाश समशेर ( मुंबई ) , सुर्यकांत कदम, भालचंद्र कांबळे (पंढरपूर), गोविंदराव खटावकर (मिरज), डॉ. दत्तात्रय खडतरे (सोलापूर), बसपाचे सांगली जिल्हा प्रभारी अतुल कांबळे (जत) इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्त्यांनी 'संत रोहिदास यांचे व्यवस्था परिवर्तन चळवळीतील योगदान' या विषयावर आपापली मते मांडली.
तसेच यावेळी कु. साक्षी व्हनखंडे, कु.भक्ती व्हनखंडे, आर्यन कणसे व कु. प्रज्ञा काटे या बालवक्त्यांनीदेखील भाषणे केली.
या कार्यक्रमात प्रारंभी संत रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत बहुजन समाज पक्षाचे जत विधानसभा अध्यक्ष तानाजी व्हनखंडे यांनी केले. प्रास्ताविक अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष किरण शिंदे यांनी केले. सूत्र संचालन सुनील सुर्यवंशी यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष सुनिल क्यातन यांनी मानले.यावेळी
No comments:
Post a Comment