Saturday, February 16, 2019

जिल्ह्यात दडपशाहीचे राजकारण चालू देणार नाही-गोपीचंद पडळकर

जत,(प्रतिनिधी)-
स्वतः कुठला उपाध्यक्ष पाणी आणतो, असे म्हणत असेल तर ते झुठ आहे. शासनाच्या योजना या जनतेच्या पैशातून होतात. खोटे बोलायचे आणि  दडपशाहीचे राजकारण करायचे,असे जिल्ह्यात सध्या सुरू आहे. आमचीही आता 'आरे' ला 'कारे' आणि 'एका ठोक्याला दोन ठोके: देण्याची तयारी आहे,असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी डफळापूर (ता. जत) येथे बोलताना केले.

खासदार संजय पाटील आणि आमदार विलासराव जगताप यांच्यावर टीका करताना ते पुढे म्हणाले,दादागिरी करायची, खोटे गुन्हे दाखल करून बाद करण्याची जत तालुक्यात निती सुरू आहे. सभापती रवीपाटील, गुड्डोडगी यांच्यावर दादागिरी करून गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी संघटीत व्हा,असे अवाहन पडळकर यांनी केले.
पडळकर म्हणाले, जत तालुक्यात टक्केवारीचा खेळ चालतो. 20-20 टक्के हाणले तरी यांचे समाधान नाही. रोजगार हमीत 50 कोटींचा घोटाळा झाला. शेतकऱ्यांच्या योजनांवर पुढारी गब्बर झाले.
छत्रपती शिवाजी महाराजासारखे विचार घेऊन जीवन जगण्याचे प्रयत्न करण्याची गरज आजच्या युवकांकडे आहे.
जत तालुक्यातील युवकाने सिंचन योजनेतून आलेले पाण्याचे योग्य व चांगल्या पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. त्याशिवाय जतचा दुष्काळ संपवण्यासाठी जलसंधारणासाठी कामे आपण सहभाग घेऊन पूर्ण करणे गरजेचे आहे यशाची योजनेसाठी शासकीय योजनेसाठी येणारा निधी हा आपल्यासारख्या सामान्य जनतेच्या खिशातून येतो तो कुणाच्या कुणाच्या खिशातून येत नाही. त्यांनी योजना राबवणे हे त्याचं काम आहे. शासकीय योजना मिळवण्यासाठी युवकांचे संघटन महत्त्वाचे आहे, त्याच्यावर टाकूनच शासकीय योजना मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे का कर्ज देत नसतील तर त्या अधिकार्‍याचे टाळूवरचे केस काढण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे अशी ताकद निर्माण करा. तरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल .युवकांनी आपली शक्ती राजकारणात वाया न घालवता उद्योग, व्यवसाय करावा. कोणत्याही पद्धतीने निवडू नये. आई-वडिलांचे कल्याण होईल असे काम करावे,गुन्हेगारी कमी झाली पाहिजे.यामुळे युवक देशोधडीला लागत आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीने अनेक पिढ्या न् पिढ्या  बरबाद होत आहे.जनतेच्या दु:खाने डोळ्यात अश्रू येईल,त्याला लोकहिताची तळमळ अाहे. अशा युवकांला गावातील नेता करा,दलाली करणाऱ्या अलातू फालतूला यात शिरकाव करू देऊ नका.गावगाड्यातील शेवटच्या माणसापर्यत मदत करण्याची तयार युवकांमध्ये असली पाहिजे.गावात माणूसकी टिकली पाहिजे यासाठी तरूणांनी गावातच रहाणे गरजेचे आहे. धार्मिक सण,उत्सव कुंटुबांनी एकत्र येऊन साजरा करावा.युवकांनी बिल गेट्सचा विचारांनी चालावे, काहीही अशक्य नाही. शेतकऱ्यांच्या अडचणी साथ द्या, बागायतदाराचे पैसे बुडविणाऱ्यां व्यापाऱ्यांना लाथा घाला.
तम्मनगाैडा रविपाटील म्हणाले, मी कोणावर विनाकारण टीका केली नाही. माझ्यावर जी टीका झाली, त्याला फक्त उत्तर दिले. जत तालुक्याच्या पूर्व भागास पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न करणे ही चूक आहे का? असा सवाल उपस्थित केला.
जत तालुक्याच्या पाण्यासाठी आम्ही कर्नाटकाचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल यांना भेटलो. यापुढेही पाण्यासाठी संघर्ष सुरूच राहिल. भविष्यात खास करून युवकांसाठी सर्व पातळीवर काम करण्यात येईल.युवक मेळाव्यास शिक्षण व सभापती तम्माणगोंडा रविपाटील, भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, प्रवीण पाटील, लक्ष्मण जखगोंड, सुनिल बिराजदार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment