जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बसर्गी येथील हणमंत ईश्वर बामणे यांनी मंडळ अधिकारी परीक्षेत जिल्ह्यामध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे.शिक्षक ते मंडलाधिकारी असा त्यांचा प्रवास इतरांना मार्गदर्शक ठरणार आहे.
श्री. बामणे जत तालुक्यातील करजगी, बेळोडगी, सनमडी, कुनिकोनूर , घोलेशवर,मायथळ इत्यादी सहा गावाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळत आहेत. जतचे प्रांताधिकारी श्री ठोंबरे यांनी श्री. बामणे यांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. बीए बीएड होऊन सुरुवातीची काही वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी काही वर्षे कोतवाल म्हणूनही काम केले. नंतर ते परीक्षा उत्तीर्ण होऊन तलाठी म्हणून काम केले. या यशाबद्दल त्यांचे तालुकाभर अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment