जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील पांडोझरी गावाखालील बाबरवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचा राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्यावतीने आदर्श शाळा पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
अलीकडेच सांगली येथील नेमिनाथनगरमधील श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती आदर्श शाळा पुरस्कार देऊन या शाळेला गौरविण्यात आले आहे. सांगलीचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ, सांगलीच्या महापौर संगीता खोत महापौर स्नेहल सांवत , जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.विकास सलगर , अधिव्याख्याता नामदेव माळी, संतोष कदम.बी.एस्.रामदुर्ग, प्रल्हाद हुवाळे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, एस.एम.सी.अध्यक्ष , सदस्य व पालक व ग्रामस्थ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
वर्षानुवर्षे दुष्काळाशी दोन हात करणारे येथील लोक वर्षातील सहा महीने विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन ऊसतोडीला जात असतात. अशा या गावापासून दोन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बाबरवस्तीवरच्या शाळेचे शिक्षक आणि पालक यांच्या मेहनतीने तसेच सहकार्याने जिल्हा परिषदेच्या मराठी रुप पालटले आहे. बाबरवस्ती शाळेत गुणवत्ता आणि पटात सतत वाढ, ज्ञानरचनावाद, इंग्रजी शब्द , पाढे, पाठांतर, मराठी लेखन ,वाचन ,वृक्ष संगोपन ,वृक्ष रोपण,विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्याला बोलक्या बोलक्या भिंतींची जोड मिळाली आहे. महेशकुमार चौगुले, माधव टार्फे,मोहनाबाई दिघे,सायसिंग पाडवी, मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांचे खुप मोठे योगदान आहे .
गटशिक्षण अधिकारी बी.एन. जगधने ,आर.डी.शिंदे, अन्सर शेख, हिरालाल लमाण, तानाजी गवारी,केंद्र प्रमुख रमेश राठोड, रामचंद्र राठोड, के.बी.पुजारी, नामदेव पुजारी, सलिमाताई मुल्ला यांच्या मागर्शनासह बाबु मोटे, तुकाराम कोरे, चंद्रकांत कांबळे , मारूती बाबर,आप्पासो गडदे, दऱ्याप्पा गडदे, माणिक बाबर, निंगाप्पा वज्रशेट्टी, दत्ताञय कोरे,आप्पासो मोटे,राजाराम गडदे मेस्ञी,तानाजी कोकरे, सुरेश गडदे,प्रकाश बाबर,गजानन मोटेविनोद माने, जगनाथ मोटे,धुळा कोकरे,सागर गडदे,जक्काप्पा मोटे आदींचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment