घातापाताचा संशय
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील कोंते बोबलाद येथील सायकल दुरुस्ती दुकानदार शहानूर खाजासाब मकानदार (वय -25,रा.कोतेंबोबलाद)याचा मृतदेह गावातील ललिता मारूती मंचद यांच्या घरासमोर संशयास्पदरित्या आढळून आला.याबाबत उमदी पोलिसांत खाजासाब मकानदार यांनी फिर्यादी दिली आहे. यात त्यांनी मुलांचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
कोंतेबाबलाद येथे शाहनूर याचे सायकल दुरूस्तीचे दुकान आहे. तो गावातच आपल्या कुटुंबासोबत राहत होता. गुरूवारी रात्री तो बाहेर जाऊन येतो म्हणून घरी सांगून गेला होता.सकाळी जत रस्त्याला राहणाऱ्या ललिता मंचद यांच्या घरासमोर शाहनूरचा मृतदेह संशास्पदरित्या आढळून आला. तर त्याची दुचाकी जिल्हा परिषद शाळेजवळ सापडली आहे.दरम्यान त्याच्या वडिलांनी रात्री झालेला हा प्रकार घातपाताचा आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थंळी पोहचत पंचनामा केला आहे. घटना संशयास्पद असल्याने उप अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थंळी भेट देऊन पोलीसांना तपासाच्या सुचना दिल्या आहेत.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण संपागे करत आहेत.
No comments:
Post a Comment