जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बसर्गी येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माणुसकी फाउंडेशनच्यावतीने गावातील कन्नड-मराठी माध्यमांचे विद्यार्थी आणि उपस्थित ग्रामस्थांना खाऊचे वाटप करण्यात आले.
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यासारख्या राष्ट्रीय सणांदिवशी शालेय विद्यार्थ्यांना पहाटे लवकर उठून शाळेत जावे लागते.ध्वजारोहणसह विविध कार्यक्रम असल्याने विद्यार्थ्यांना दुपारपर्यंत घरी जाता येत नाही. यामुळे त्यांना उपाशी राहावे लागते. याचाच विचार करून माणुसकी फौंडेशनच्या दानशूर व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी अंगणवाडीपासून ते प्राथमिक,माध्यमिक आणि महाविद्यालयीनपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
माणुसकी फौंडेशनचे हणमंत बामणे, छोटू बामणे , भैरवनाथ बामणे, हणमंत पटेद , संजय बामणे ,महेश बामणे व उपसरपंच किशोर बामणे यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी विकास सोसायटीचे अध्यक्ष शिवाप्पा तावंशी, परगोंडा हुल्यालकर, पिरगोंडा बिरादार, सरपंच सौ. इंदुमती पाटील, तुळशीराम बामणे, शिक्षक, ग्रामस्थ,विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment