Thursday, January 10, 2019

सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांमध्ये जोरदार हाणामारी

जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील विकासकामांच्या संदर्भात जत नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकात चर्चा सुरू असताना प्रथम शाब्दिक बाचाबाची झाली .या शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतर नंतर  मारामारीत झाले आहे. सत्ताधारी  गटातील एका नगरसेवकाने विरोधी गटातील एका नगरसेवकाला जोरदारपणे कानशिलात लगावली यामुळे नगर पालिकेतील वातावरण कांहीवेळ तणावपूर्ण झाले . परंतु इतर उपस्थित नगरसेवकांनी दोघांनाही शांत करून सदरचे प्रकरण आपापसात मिटवली आहे . ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. यासंदर्भात जत पोलिसात कोणत्याही स्वरूपाची तक्रार रात्री उशिरापर्यंत दाखल करण्यात आली नाही.परंतु या घटनेची  जत नगरपालिकेसह  शहरातील राजकीय वर्तुळात जोरदार उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे.

       याबाबत अधिक माहिती अशी की, सत्ताधारी गटातील कांही नगरसेवक नगर पालिका सभागृहात बसले असताना विरोधी गटातील एक नगरसेवक तेथे आले व सत्ताधारी गटातील एका नगरसेवकांसोबत विकास कामासंदर्भात चर्चा करू लागले. आपल्या प्रभागात आपण मिळून विकास काम करूया तुमच्या सत्ताधारी गटातून माझी अडवणूक होऊ लागली आहे. त्यामुळे कोणतेही काम होईनासे झाले आहे.  असे तो म्हणत असताना सत्ताधारी गटातील एक माजी नगराध्यक्ष  उठून त्याना म्हणाले , विकास कामाला तुम्ही सतत विरोध करत आहे. न्यायालयात जाऊन काही कामाला तुम्ही स्थगिती मिळवली आहे .तर काही कामाची निविदा कमी दराने भरून विकास कामाला खो घालण्याचा प्रयत्न केलेला आहे .त्यामुळे त्यांची तक्रार तुम्ही ऐकून घेऊ नका  असे त्यांनी सांगितले.
      यानंतर तक्रार सांगणारे विरोधी गटातील नगरसेवक  व सत्ताधारी गटातील माजी नगराध्यक्ष यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली सदरची घटना घडल्यानंतर त्यांना तेथे उपस्थित  असलेल्या नगरसेवकानी समजावून सांगून परत पाठवून दिले परंतु त्या नगरसेवकाने घरी जाऊन घरातील नातेवाईक व  समर्थक  नगरसेवकांना बोलवून घेऊन ते परत नगरपालिका सभागृहात आले . सदरचे प्रकरण मिटले असताना तुम्ही परत या सर्वांना घेऊन येते का आला आहे .असा जाब सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी विरोधी गटातील त्या  नगरसेवकांना विचारला असता यावरून त्यांच्यात तू तू मी मी आणि त्याच्यात जोरदार बाचाबाची आणि  हाणामारी झाली . यावेळी सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने विरोधी गटातील  एका नगरसेवकांच्या जोरदारपणे कानाखाली लगावली यामुळे  पालिकेतील वातावरण तणावपूर्ण झाले .उपस्थित इतर  नगरसेवकांनी सर्वांना शांत करून सभागृहातून खाली पाठवले .ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान नगरपालिका सभागृहात झाली घडली आहे . या घटनेची नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात चवीने चर्चा केली जात आहे .
     यासंदर्भात  नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवार व उपनगराध्यक्ष  आप्पासाहेब पवार यांच्याशी संपर्क  साधला असता ते म्हणाले की,  सत्ताधारी गटातील नगरसेवक विकास कामाच्या संदर्भात नियोजन करण्यासाठी नगरपालिका सभागृहात थांबले होते . परंतु विरोधी गटातील एक नगरसेवक येऊन आमच्या गटातील एका नगरसेवकाकडे विकास कामाच्या संदर्भात तक्रार करत होते .त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो .परंतु ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते  . यावरून सत्ताधारी गटातील माजी नगराध्यक्ष  व त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली . त्यानंतर ते परत निघून गेले होते .काही वेळानंतर ते इतर समर्थक नगरसेवक व घरातील नातेवाईकाने घेऊन परत नगरपालिका सभागृहात आले असता.तुम्ही इतरांना घेउन नगरपालिका सभागृहात का आला आहे . हा नगरपालिकेचा विषय आहे . यासंदर्भात आम्ही त्यांच्याकडे  विचारपूस केली असता त्यांचे समर्थक एक  नगरसेवक आमच्या नगरसेवकांच्या अंगावर धावून जाऊन मारहाण करण्याचा प्रयत्न करत असताना आमच्या नगरसेवकाने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आहे . विरोधी गटातील काही नगरसेवक ठेकेदाराना हाताशी धरून विकास किमाना  खो घालण्यासाठी कमी दराने विकास कामाच्या निविदा भरून काम बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत .याशिवाय विकास काम होऊ नये म्हणून न्यायालयातून स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत .परंतु आमची भूमिका ही सामंजस्याची असून आम्ही विरोधकांना सतत सहकार्य करत आलो आहे. यापुढे त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करावा अशी मागणी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment