Tuesday, January 15, 2019

बेवनूरमध्ये जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा


जत,(प्रतिनिधी)-
 बेवनूर (ता. जत) येथे संभाजी ब्रिगेड शाखेच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा 421 वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन संभाजी ब्रिगेड सांगलीचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी केले.

 जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुधीर नाईक यांनी राजमाता जिजाऊंबद्दल माहिती सांगितली. बेवनूर शाखाध्यक्ष विठ्ठल शिंदे, पांडुरंग देवकर, विजयकुमार नाईक, स्वप्निल शिंदे, शंकर पारेकर, समाधान गायकवाड, संदीप शिंदे, श्रेणिक नाईक, ॅड. मदन नाईक, शरद सरगर, बयाजी सरगर, महादेव देवकर, बळीराम शिंदे, संभाजी शिंदे, दगडु वायदंडे, दीपक शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment