Thursday, January 10, 2019

तासगाव-चडचण रस्ता रुंदी-डांबरीकरणाचा शुभारंभ


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातून  जाणार्या तासगाव ते चडचण या राज्यमार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

 तासगाव -  लांडगेवाडी - जत - चडचण राज्य मार्ग व्हसपेठ ते कर्नाटक हद्द डांबरीकरण व रस्ता रुंदीकरण कामासाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.  यापूर्वी हा रस्ता 3.75 मीटर इतका रुंद होता आता 5.50 मीटर रुंदीकरण करण्यात येणार  आहे. आज आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते  रस्त्याच्या डांबरीकरण कामाची सुरवात करण्यात आली. सदर रस्त्याची लांबी  32 कि. मी. इतकी असून आत ता हा रस्ता  5.50 मीटर रुंद होणार आहे. यावेळी माजी सभापती प्रकाश जमदाडे, जि. . सदस्य सरदार पाटील, . . सदस्य विष्णू चव्हाण व विठल निकम,  राम साळुंखे, उप अभियंता अजिंक्यकुमार ठोंबरे आणि  व्हसपेठ व कोळगिरी या परिसरातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment