माडग्याळमध्ये जत तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार
जत,(प्रतिनिधी)-
इलेक्ट्रॉनिक वाहिनी, सोशल मीडियापेक्षा प्रिंट मीडियाने आजही विश्वासाहर्ता
जपली आहे. सामाजिक जडणघडणीत पत्रकारांचा सिंहाचा वाटा असल्याचे
प्रतिपादन तुषार ठोंबरे यांनी केले. प्रकाशराव जमदाडे फौंडेशनच्या
वतीने माडग्याळ येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार
व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून
प्रांताधिकारी तुषार ठोंबरे बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जतचे तहसीलदार सचिन
पाटील,
गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, माजी सभापती व
विद्यमान सदस्या मंगल जमदाडे, पंचायत समिती सदस्य विष्णू चव्हाण,
माजी सभापती बसवराज बिरादार, भुयारी मठाचे मठाधिपती
तुकाराम महाराज, माडग्याळचे सरपंच इराण्णा जत्ती, लकडेवाडीचे सरपंच एकनाथ बंडगर, सोन्याळचे जकाप्पा निवर्गी,
प्राचार्य बी. जी. महाजन,
व्याख्याते एस. आय. हिरगोंड,
डॉ. शेखर हिट्टी, सांगली
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल निकम, सोमण्णा हाक्के,
आयोजक तथा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे
यांची उपस्थिती होती.
तुषार
ठोंबरे म्हणाले, काळाच्या ओघात पत्रकारिता बदलली असली तरी आव्हाने
कायम आहेत. समाज बदलण्यासाठी प्रथम मानसिकता बदलणे गरजेचे आहे
व ते काम पत्रकार प्रामाणिकपणे करतात. लोकशाही समृद्ध होण्यासाठी
पत्रकार बहुश्रुत असणे काळाची गरज आहे. सर्व क्षेत्रात वेगळा
गट असू शकतो, पण सामाजिक क्षेत्रात काम करणार्यात गट असता कामा नये. कार्यक्रमाच्या सुरुवातीला
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे
पूजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकार जयवंत
आदाटे, मनोहर पवार, किरण जाधव, मारुती मदने, राजू माळी, मच्िंछद्र
ऐनापुरे, अमोल कुलकर्णी, हरी शेटे,
सोमलिंग कोळी, बादल सर्जे, विठ्ठल ऐनापुरे, नजीरभाई चटरगी, राजू ऐवळे, इब्राहिम शेख, रियाज
जमादार, राजू जमादार, नितीन टोणे,
बाळासाहेब बुद्धसागर, गोपाळ पाथरुट, विजय रुपनूर, नाना गडदे, मच्िंछद्र
बाबर, मलकारी वायचळ, भागवत काटकर,
गजानन पाटील, सुनील घाडगे, केराप्पा हुवाळे, दत्ता सावंत, प्रदीप कोडग, गजानन पतंगे, वीरुपाक्ष
येवले, संभाजी सावंत, वंसत सावंत,
संजय कटगोंड, नारायण भोसले, सतीश आजमाने, रामण्णा सन्नाळे, सुभाष कोकळे, राहुल संकपाळ, गोरखनाथ
भोसले, विजय चौगुले, शिंदेसर, हिरगौडा कावडे यांचा सत्कार करण्यात आला.
एस.
आय. हिरगोंड, पत्रकार किरण
जाधव, मारुती मदने, राहुल संकपाळ,
दत्ता सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाशराव
जमदाडे फौंडेशनचे अध्यक्ष अभय जमदाडे, सचिव विजय रुपनूर,
किशोर निकम, अॅड.
सागर व्हनमाने, प्रमोद जमदाडे, सिद्धू कोळे, पांडुरंग सावंत, सिद्धेश्वर माळी, लक्ष्मण गायकवाड, विजयकुमार
बगळी, महांतेश बिराजदार आदी उपस्थित होते.
जत पत्रकारांचे योगदान मोठे : जमदाडे
जतच्या पत्रकारांचे तालुक्यातील योगदान मोठे आहे. सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत असणार्या पत्रकारांनी
जत बाजार समितीच्या निर्मितीसह अनेक विषयांवर आवाज उठविला असल्याचे सांगून प्रकाश जमदाडे
म्हणाले की, येणार्या काळात तालुक्यात
भयावह दुष्काळ पडला आहे. या दिनाचे औचित्य साधून पत्रकार व प्रशासन
यांच्यात समन्यव साधला जावा. प्रशासनाने तालुक्यात तातडीने दुष्काळाच्या
उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.
दुष्काळाबाबत जनजागृती करा: तुकाराम महाराज
जत तालुक्यात
1972 पेक्षाही भयानक दुष्काळ पडला आहे. या दुष्काळात
जनजागृती करून शासनाला जागे करावे. जत तालुक्यातील सर्व पत्रकारांना
पाण्याची टाकी देण्यात येणार असून त्यांनी ती गावात, वाडी-वस्तीवर बसवावी. तालुक्यात 158 दिवस चारा छावणी सुरू करण्यात येणार आहे. त्यास सर्वांनी
सहकार्य करावे, असे आवाहन तुकाराम महाराज यांनी केले.
No comments:
Post a Comment