Monday, January 14, 2019

चारा छावण्या ,पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी बेमुदत उपोषण


जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळी जत तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी प्रशासनाने जनावरांसाठी चारा छावण्या व दुष्काळग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत या मागणीसाठी भटक्या विमुक्त जाती-जमाती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन मदने यांच्या नेतृत्वाखाली आजपासून जत तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाकडून दुष्काळ जाहीर करून दोन महिने उलटले तरी अद्याप दुष्काळी जत तालुक्याला कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. सध्या  जत तालुक्यातील जनतेला भीषण दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नाबरोबर जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न तीव्र बनला आहे. एवढी दुष्काळी परिस्थिती सर्वत्र ओढवली असतानाही शासन मात्र झोपेच  सोंग घेत असून दुष्काळग्रस्त जनतेची चेष्टा करीत आहे. या झोपी गेलेल्या शासनाला जाग आणण्यासाठी आजपासून वरील  मागण्यांसाठी सचिन मदने यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम चव्हाण, मंजू मोगली. हेमंत  खाडे,अशोक कोळी, पवन कोळी, प्रथमेश पवार, संतोष कुलाळ, अभिजीत शेजूळ,साहिन बिरादार, प्रशांत वाघमोडे, रहिमान उमराणी, राजेश गणाचारी यानी पाठींबा दिला आहे.

No comments:

Post a Comment