Thursday, January 10, 2019

उंटवाडी-मेंढेगिरी रस्त्याचे काम निकृष्ट

(उंटवाडी-मेंढिगिरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे.)

चौकशीची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत होणारा उंटवाडी ते मेंढीगीरी(ता-जत) हा रस्ता अत्यंत दर्जाहीन बनत असून या कामाची चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्यावर 10 ऐवजी 8 सीडी वर्क( पूल) बांधले गेले आहेत. वाहनांना तात्पुरता रस्ता (साईडपट्टी) करून दिला नाही, चालू कामावरून वाहने ये-जा करतात. त्यामुळे खडी विस्कटली जाऊन एकसंध रस्ता बनण्यास अडथळा निर्माण होतोय. मोठ्या खडीवर क्रशड खडी न टाकता फक्त मुरूम तोही मातीमिश्रित टाकला जात आहे. मातीमिश्रित खडी वापरली जात आहे. मुरुमावर योग्य पाण्याचा स्प्रे व रोलर न वापरल्याने रस्ता दर्जाहीन बनत आहे.  यासंदर्भात कार्यकारी अभियंता (प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजना) सांगली यांना भेटून निवेदन देण्यात आले आहे. यावेळी उंटवाडीचे सरपंच राजू पाटोळे, बी. एस. खोत, संतोष फडतरे, सिद्राया खोत उपस्थित होते.

No comments:

Post a Comment