Sunday, January 13, 2019

जतचे माजी सरपंच भीमराव मोरे यांचे निधन

जत,(प्रतिनिधी)-
तत्कालीन जत ग्रामपंचायतीचे सरपंच व काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते भिमराव आण्णाप्पा मोरे ( वय ६८  रा. विठ्ठलनगर जत ) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी रात्री राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी , तीन मुले  व दोन मुली , सुना , नातवंडे असा परिवार आहे .

आज (रविवार ) दुपारी हिंदू स्मशानभूमी जत येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी राजकीय , सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील  मान्यवर उपस्थित होते. सोमवारी सकाळी आठ वाजता रक्षाविसर्जन कार्यक्रम होणार आहे.
  स्व.भीमराव मोरे हे सन १९९२ ते १९९९  पर्यंत जत ग्रामपंचायत मध्ये सदस्य , उपसरपंच व सरपंच म्हणून कार्यरत होते.  सन १९९६  ते ९९ अखेरपर्यंत तिन वर्षे  सरपंच म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जत शहरात समाधानकारक काम केले होते.  जत ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर त्यानी आपला मुलगा परशुराम मोरे याना नगर पालिका निवडणुकीत उभे करून नगरसेवक पदाची संधी दिली होती. भिमराव मोरे यानी जत शहर पँनलप्रमुख म्हणून काम करून  काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर परशुराम मोरे याना निवडून  पाठवले होते.

No comments:

Post a Comment