Sunday, January 13, 2019

वंचित गावांना म्हैसाळचे पाणी सोडा अन्यथा बेमुदत उपोषण : प्रकाश जमदाडे


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकर्यांनी पैसे भरूनही दोन महिने झाले तरीही म्हैसाळचे पाणी सोडले जात नाही. सोमवार दि.14 पर्यंत पाणी न सोडल्यास बुधवारी आमदार विलासराव जगताप ,जिल्हा परिषद सदस्य ,सभापती ,पंचायत समिती सदस्य,पदाधिकारी व शेतकरी सांगलीतील अधीक्षक अभियंता कार्यालय कृष्णा कोयना उपसा जलसिंचन कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा मार्केट कमिटी सांगलीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी दिला. याबाबतचे निवदेन कृष्णा कोयना उपसा जलसिंचन कार्यालय व संबंधिताना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे गेल्या तीन महिन्यापासून म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु आहे. जत तालुक्यातील येळवी, कासलिंगवाडी, बागलवाडी, सिंगणहळळी, या गावातील शेतकर्यानी एक ते दीड महिन्या अगोदर पैसे भरुनही अद्याप पाणी सोडले नाही. याबाबत आमदार विलासराव जगताप, खासदार संजय पाटील यांनी सदरच्या गावांना पाणी सोडावे म्हणून सूचना देवूनही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. याकरिता दि.16 पासून जोपर्यंत संबंधित गावाना मिळेपर्यंत बेमुदत उपोषण सुरुच असणार असल्याबाबतचे स्पष्ट केले. प्रशासनाला जाग केव्हा येणार ? जत तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढतच आहे. शेतकरी खचून गेला आहे.पिण्याचा प्रश्न जटिल बनला असताना म्हैसाळच्या पाण्यासाठी दोन महिने अगोदर पैसे भरूनही पाणी मिळत नसल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.काही शेतकर्यांनी आत्मदहनचा इशारा देऊनही प्रशासन डोळेझाक करीत आहे.

No comments:

Post a Comment