(जंगम समाजाच्या बैठकीप्रसंगी मरूळशंकर स्वामी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.) |
जत तालुका जंगम विकास संस्थेची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा जंगम समाज विकास संस्थेची बैठक नुकतीच जत येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. आर.के. स्वामी होते. या बैठकीत जंगम समाजास ओबीसी दाखले मिळावेत असा सूर निघाला.
जंगम समाजाची काही ठिकाणी हिंदू लिंगायत अशी नोंद झाली असल्याने ओबीसी दाखले मिळत नाहीत. जंगम असा उल्लेख नसल्याने जंगम दाखला मिळत नाही, यासाठी तालुका स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत निवेदन देण्याचे ठरले. जर पूढे शासनाने दुर्लक्ष केले तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. त्याच बरोबर समाजासाठी शासनाने 10 टक्के आरक्षण दिले आहे या आरक्षणाचा लाभ समाजाने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यात गूरूबाळ गुड्डीपूर शिवानुभव मठाचे मरूळशंकर स्वामीजी,आण्णय्य स्वामी, आमदारांचे सहाय्यक अशोक स्वामी, समाजासाठी दिनदर्शिका व समाज कार्याबद्दल प्रवीण ईरय्या हिरेमठ आदींचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन करबसवेश्वर हिरेमठ यांनी केले तर आभार महादेव स्वामी यांनी मानले.
No comments:
Post a Comment