|
मयत अशोक दिघे |
जत,(प्रतिनिधी)-
जत- सांगली रस्त्यावर गुरुवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अशोक सोपान दिघे (वय 52,राहणार सांगली शहर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर त्यांची दोन मुले शुभम (वय 19) पण नम्रता (वय 14) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
|
जखमी नम्रता |
अधिक माहिती अशी की,सांगली येथील अशोक दिघे हे गुरुवारी सकाळी जत येथे आपल्या सासरवाडीत आले होते. त्यांच्या नातेवाईकांचा तेरावा विधी कार्यक्रम असल्याने अशोक दिघे हे सांगलीतून मोटर सायकलवरून मुलगा शुभम आणि मुलगी नम्रता यांना घेऊन आले होते. दुपारी तीन वाजता विधी कार्यक्रम उरकल्यानंतर ते सांगलीकडे निघाले होते. त्यांची गाडी डफळापूर जवळ असणाऱ्या कुडणुर फाट्यापर्यंत आल्यावर सांगलीहून जतकडे येणारा सिमेंट मिक्सर ट्रक (क्रमांक एम एच क्यू डब्ल्यू 3609 ) मोटरसायकल (क्रमांक mh10 झेड 80 34) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी गंभीर होती की मोटर सायकल चालक अशोक दिघे हे जागीच ठार झाले, तर मुले शुभम व नम्रता गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर तातडीने नम्रता व शुभम यांना उपचारासाठी मिरजकडे हलवले. त्यानंतर घटनेची माहिती जत पोलिसांना दिली.
|
जखमी शुभम |
पोलिसांनी तात्काळ अपघात स्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अशोक दिघे यांचे मेहुणे प्रशांत चव्हाण (रा, सांगली ) यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक व चालकास ताब्यात घेतले आहे. पोलिसात अपघाताचा गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
No comments:
Post a Comment