जत,(प्रतिनिधी)-
एक शिक्षक ते राज्याचे मंत्री, भारती विद्यापीठाचा
डोलारा उभा करणारे स्वर्गीय पतंगराव कदम हे एक अजब रसायन होते. प्रचंड कामाचा उरक आणि माणसांची जाणीव असणारे संवेदनशिल नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला
ते परिचीत होते. त्यांच्या जाण्याने सांगली जिल्हा पोरका झाला
आहे. परंतु त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याची जबाबदारी आपणा
सर्वांची असून, त्यांचे कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन सांगली
बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी केले.
जत येथील विक्रम फौंडेशन
आणि फेलोशिफ ऑफ दि फिजीकली हॅन्डीकॅपड् संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय
पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित दिव्यांग शिबिरात दिनकर पाटील बोलत होते. यावेळी
शहर काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विक्रमदादा सावंत,
माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, पी. एम. पाटील, डॉ. बबन कोडग, पीआरओ प्रियंका गदरे, कुंडलिक दुधाळ, दिग्वीजय चव्हाण, महादेव पाटील, नगराध्यक्षा सौ. शुभांगी बन्नेनवार, ऍड. युवराज
निकम, बाबासाहेब कोडग, इकबाल गवंडी,
भूपेंद कांबळे, मोहनराव कुलकर्णी, सुजयनाना शिंदे, निलेश बामणे, संतोष
पाटील, रामगोंडा संत्ती, अभीजीत चव्हाण,
रवींद्र सावंत, दत्ता निकम, सरपंच रवी पाटील, विकास माने, राहुल
काळे, संतोष भोसले, एकनाथ बंडगर यांच्यासह
पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिनकर पाटील
म्हणाले, जत तालुक्यावर स्वर्गीय कदम साहेबांचे अपार पेम होते. जतची जनतेला त्यांनी नेहमीच आपुलकीची वागणूक दिली. जत
तालुक्याच्या विकासात कदम साहेबांचे योगदान मोठे होते. मुळात
स्वयंभूपणा त्यांच्याकडे होता. शिक्षक ते राज्याचे ज्येष्ठ मंत्री
आणि भारती परीवार हा डोलारा उभे करणारे त्यांचे कार्य वाखाण्याजोगे होते. त्यामुळे जरी ते आज आपल्यात नसले तरी त्यांच्या समृध्द विचारांचा वारसा जपण्याची
जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. यावेळी त्यांनी बाजार समितीचे त्रिभाजन
करण्याची भूमिका या सरकारने घेतली आहे. परंतु जोवर आमचे संचालक
मंडळ आहे, तोवर बाजार समितीचे त्रिभाजन होणार नाही, असेही पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी विक्रम फौंडेशनने
राबवलेल्या दिव्यांग शिबिराचे विशेष कौतुक केले.
शहर काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज
पाटील म्हणाले,
जतला विक्रम सावंत यांनी हे दुसऱयांदा शिबिर घेतले आहे. पहिल्या शिबीरालाही आपण उपस्थित होतो. खरेतर दुष्काळी
भागातले दिव्यांग शोधणे आणि त्यांना आवश्यक साधने मोफत देण्याचे हे काम खूप मोठे आहे.
स्वर्गीय पतंगराव कदम यांनी आपले आयुष्य दीन दलित, दुबळया माणसांसाठी खर्ची केले. त्याच विचारांनी जत तालुक्यात
विक्रम सावंत आणि त्यांची टीम काम करते आहे. यावेळी पाटील यांनी
कदम साहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
विक्रम सावंत म्हणाले, फेलोशिफ
ऑफ दि फिजीकली हॅन्डीकॅपड् संस्था मुंबई
आणि विक्रम फौंडेशन हा उपक्रम घेवून दिव्यांगाना आधार देण्याचा
प्रयत्न केला आहे. स्वर्गीय कदम साहेबांच्या जयंती निमित्त हे
दुसऱयांदा शिबिर होत आहे. जत तालुका हा मागास लोकांचा भाग आहे.
या तालुक्यात अनेक दिव्यांग आहेत. पण परिस्थीती
आणि शिक्षणाच्या अभावामुळे ते आवश्यक साधणे उपलब्ध करण्यापर्यंत पोहचत नाहीत.
जतेची सामाजिक बांधीलकी म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे. जवळपास साडे तीनशे दिव्यांगाना याचा लाभ दिला आहे. स्वर्गीय
पतंगराव कदम यांनी नेहमीच आमच्यावर चांगले संस्कार आणि विचारधारा दिली आहे.
जतेच्या विकासात त्यांच्या विचारांचा वसा घेवून काम करतो आहोत.
आज ते आपल्यात नाहीत, परंतु त्यांचे कार्य पदोपदी
आमच्या सोबत आहे. येणाऱया काळातही त्यांच्या आदर्श विचारांनी
वाटचाल करू अशी ग्वाही दिली. यावेळी कुंडलिक दुधाळ, बबन कोडग, प्रियांका गदरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन राजेंद्र माने यांनी केले. आभार सुजयनाना
शिंदे यांनी मानले. नियोजन ऍड. युवराज निकम,
समाधान शिंदे, बंडू शेख, योगेशदादा व्हनमाने यांनी केले.
No comments:
Post a Comment