Saturday, January 26, 2019

के.एम.हायस्कूलमध्ये व्याख्यानमाला, स्नेहसंमेलन उत्साहात


जत,(प्रतिनिधी)-
जत येथील के.एम.हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज त्याचबरोबर शारदा विद्यामंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बसव व्याख्यानमाला मोठ्या उत्साहात पार पडली. सलग तीन दिवस चाललेल्या व्याख्यान, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांच्या मेजवानीचा विद्यार्थी, पालक आणि प्रेक्षक आदींनी मनमुराद आस्वाद घेतला.

व्याख्याते भीमराव पाटील यांनी संस्कारशील समाजासाठी बसवतत्त्वांची गरज या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी बोलताना भीमराव पाटील म्हणाले की, आजच्या मुलांना नोकरी मिळवण्याचे शिक्षण देण्यापेक्षा संस्कार देणे महत्त्वाचे आहे. संस्कारशील पिढी घडल्यास देशाची प्रगती वेगाने होईल. आज वाईट विचार आणि घटनांमुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी बसवेश्वर महाराजांचे तत्वज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. दुसर्यादिवशी जयवंत औटे यांचे विनोदी कथाकथन झाले. त्यांच्या कथाकथनाच्या बहारदार कार्यक्रमामुळे प्रेक्षक मनमुराद हसले. तिसर्यादिवशी शारदा विद्यामंदिर आणि के.एम.हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.यावेळी लहानग्या चिमुकल्यांसह माध्यमिक आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केला. काही नाटुकल्याही सादर करण्यात आल्या. प्रकाश कोळी यांनीदेखील किशोरकुमार यांच्या आवाजात काही बहारदार गाणी सादर केली. प्रेक्षकांनी या कार्यक्रमांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
मुख्याध्यापक आर.एम. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.एम.यू.शिंदे, पर्यवेक्षक एम.एस.सोलापुरे, यांच्यासह आर.जी.व्यवहारे, जी.एल. बिराजदार, आर.बी. यरगल, एन.एस. तुरेवाले, एस.सी. माळी, एस.एम.तेली यांच्या अन्य शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.दी पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि सदस्यही यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment