Wednesday, January 9, 2019

सव्वा लाखाचे डिझेल लंपास


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील देवनाळ येथील भुवनेश्वरी किसान सेवा केंद्रातील पेट्रोल पंपावरील डिझेल टाकीत पाईप सोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन हजार लिटर डिझेल लंपास केले आहे. त्याची किंमत एक लाख बत्तीस हजार रुपये आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली. याप्रकरणी व्यवस्थापक विलास शामराव जगताप यांनी जत पोलिसांत फिर्याद दिली आहे.

जत-उमराणी रस्त्यावर देवनाळ गावापासून अलिकडे दोन किलोमीटर अंतरावर भुवनेश्वरी किसान सेवा केंद्राचे पेट्रोलपंप आहे. मंगळवारी रात्री व्यवस्थापक जगताप यांनी पेट्रोलपंप बंद करून झोपले होते. मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी टाकीवरील पाईपचे तोंड उघडून हातपंपाद्वारे उपसा करून डिझेलची चोरी केली. बुधवारी सकाळी टाकीतील डिझेल साठा तपासताना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार जत पोलिसांत अज्ञातांविरोधात फिर्याद देण्यात आली. अधिक तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment