Sunday, January 20, 2019

डफळापूर जिल्हा परिषद शाळा क्र.2 मध्ये स्नेहसंमेलन

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील डफळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा क्र.2 येथे 'संगीत कस्तुरी 2019' या नावाने स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. पालक आणि गावकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
    विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी क्रमिक अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. भविष्यातील कलाकाराचा पाया इथेच घातला जातो, असे म्हटल्यास वावगे होणार नाही आणि म्हणूनच शाळा, शिक्षक, पालक यांच्याप्रमाणे विद्यार्थीदेखील स्नेहसंमेलनाची आतुरतेने वाट पाहत असतात. मुलांसाठी स्नेहसंमेलन खूप महत्त्वाचे असते.

यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी व हिंदी गाण्यावर नृत्य सादर केले. यामध्ये 'बेटी बचाव बेटी पढाव', 'शेतकऱ्यांच्या विविध समस्या', 'व्यसनाधिनतेचे तोटे' या विषयावर नृत्य व नाटिका सादर केल्या. विविधरंगी वेशभूषा व नृत्याविष्कार पाहून सलग तीन तास मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या  प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची किमया शाळेतील मुलींनी केली.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शाळेतील शिक्षक आरती कांबळे,जयश्री मगदूम,मनीषा शिंत्रे, अजंता लोंढे, शंकर कुंभार,उद्योगरत्न संकपाळ, आधी शिक्षकांनी नियोजन केले. यासाठी मुख्याध्यापिका रेखा कोरे, केंद्रप्रमुख शंकर बेले व सुरेंद्र सरनाईक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले
     या कार्यक्रमास जि. प.सदस्य महादेव पाटील, मार्केट कमिटी संचालक अभिजित चव्हाण, सरपंच बालिका चव्हाण, बाबासाहेब माळी सदस्य ग्रा.प. डफळापूर,माजी उपसभापती  डॉ देवयानी गावडे, माजी सरपंच राजश्री शिंदे, सुभाष गायकवाड, अध्यक्ष मराठा स्वराज्य संघ सांगली जिल्हा, ग्रा प सदस्य अजित खतीब, सुनील गायकवाड, सतीशा पाटील, विजया माळी, पवित्रा हाताळे, मालन गडदे, नंदाताई गावडे, शिक्षक बँक संचालक  रमेश पाटील, दऱ्याप्पा कट्टीकर,सचिन माळी, प्रवीण कोष्टी, प्रशांत माळी, कायपुरे,  सौ. लोहार, आटपाडकर,  झांबरे, मनीषा शिंदे, संजय सूर्यवंशी, भारत गायकवाड, किरण कोळी, विजय संकपाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे एसएमसी अध्यक्ष विकास शिंदे (गोटू) उपाध्यक्ष हणमंत कोळी, सदस्य धनाजी चव्हाण, मालोजी भोसले, ज्योती सावळे, नानासो कोरे, संजय राठोड, पल्लवी बन्ने,अश्विनी संकपाळ यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी अनेकांनी आर्थिक तसेच वस्तुरुपाने साह्य केले.शेवटी आभार भाऊसाहेब महानोर यांनी मानले.

4 comments: